You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद- राजेश टोपे
राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आलं असून रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ज्या जिल्ह्यांमधील कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे, अशा जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेतला आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं. तिथे कोव्हिड सेंटर वाढवून आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अतिरिक्त कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहेत.
या 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद
- सातारा
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
- उस्मानाबाद
- बीड
- रायगड
- पुणे
- हिंगोली
- अकोला
- अमरावती
- कोल्हापूर
- ठाणे
- सांगली
- गडचिरोली
- वर्धा
- नाशिक
- अहमदनगर
- लातूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (25 मे) 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यानं लसीकरणासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्राने लशी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.
या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे-
- राज्यात आता म्युकर मायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केला आहे.
- म्युकर मायकोसिसचे रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक.
- याला लागणारे एम्फोटेरेसिन इंजेक्शन्सचं नियंत्रण केंद्र सरकारने केलेलं आहे.
- केंद्र सरकारकडून येणाऱ्या औषधांचं प्रत्येक जिल्ह्यात वाटप केलं जात आहे. त्यामुळे या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
- यावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- 131 रुग्णालयं यावरील उपचारांसाठी निश्चित केली आहेत.
- 2200 पैकी 1007 रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दाखल आहेत त्यांच्यावर मोफत उपचार सुरू आहेत
- खाजगी रुग्णालयात मोफत उपचार किंवा शासन ठरवेल त्या दराने बिल आकारावे यासाठी प्रयत्न करतोय
- राज्याला ग्लोबल टेंडर माध्यमातून एम्फोटेरेसिन इजेक्शनच्या 60 हजार व्हाईल 1 जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत
- म्युकरमाकोसिसबाबत आम्ही जागरूक आहोत. रुग्ण वाढू नये, प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत
- मास्क दंड आणि इतर माध्यमातून उपलब्ध झालेले पैसे म्युकर मायकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)