भंडारा : एकाच दिवसात वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांचा बुधवारी (12 मे) मृत्यू झाला आहे.
यापैकी दोन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून झाला आहे.
जिल्ह्यातील गराडा बुजुर्ग बिट वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या टेकेपार उपसा सिंचन योजनेच्या कॅनलजवळ हा प्रकार घडला आहे.
"या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनिविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. बछड्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे," असं उप-वनसंरक्षक रविन्द्र भलावी यांनी सांगितलं आहे.
तर पवनी वन परिक्षेत्रात आणखी एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे.
पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बीटमध्ये एका वाघिणीला दोन बछडे असतांना तिने एका बछड्याला गुडेगाव बीट मधील जंगलात सोडलं होतं.
वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्या बछड्याचे पोषण करून ज्या ठिकाणी वाघिणीने सोडलं, त्याच ठिकाणी या वाघिणीची भेट होईल या आशेनं त्याला तिथं ठेवलं होतं.
संपूर्ण घटनाक्रमावर वनविभाग उपसंरक्षक नजर ठेवून होते. मात्र सकाळपर्यंत वाघीण आलीच नाही आणि त्या एकट्या नवजात बछड्याचा मृत्यू झाला.
या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.
"भविष्यात वाघांचे दुर्दैवी मृत्यू थांबवायचे असतील तर देखरेखीची यंत्रणा अधिक मजबूत करावी लागणार आहे," असं गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षण सावन बाहेकर यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








