कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट बरखास्त, पश्चिम बंगालबाबत केलं होतं ट्वीट

कंगना राणावत, ट्वीटर, सोशल मीडिया, पश्चिम बंगाल निवडणुका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट बरखास्त करण्यात आलं आहे. ट्विटरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचा दावा करणारं ट्वीट कंगनाने सोमवारी केलं होतं. हे ट्वीट हिंसेला चिथावणी देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. कंगनाचा ट्विटर अकाऊंट बडतर्फ करण्यात यावा अशी मागणीही अनेकांनी केली होती.

द्वेष पसरवणं आणि अपमानास्पद वागणूक देण्याविषयीच्या ट्विटरच्या नियमांचं कंगनाने उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

आपल्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटलंय, "ट्विटरने माझं म्हणणं सिद्धच केलंय की ते अमेरिकन आहेत, आणि त्यांना वाटतं की श्वेतवर्णीय म्हणून ते कृष्णवर्णीयांना गुलामांसारखं वागवू शकतात. त्यांना वाटतं की ते तुमच्या विचारांवर, भाष्यावर नियंत्रण ठेवू शकतात. पण सुदैवाने माझ्याकडे इतरही प्लॅटफॉर्म आहेत, जिथे मी माझं मत व्यक्त करू शकते, माझ्या सिनेमांमधूनसुद्धा. मी या देशाच्या तमाम लोकांच्या पाठीशी उभी आहे, ज्यांना गुलामाची वागणूक देण्यात आली, ज्यांच्यावर अत्याचार केले गेले, आणि ज्यांचा आवाज हजारो वर्षांपासून दाबला जातोय आणि अजूनही ज्यांच्या छळाला अंत नाही..."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं होतं की ममता बॅनर्जी यांचा झंझावात रोखण्यासाठी तुमचं विराट रूप दाखवा. या ट्वीटवरून चर्चेला तोंड फुटलं होतं.

कंगना राणावत, ट्वीटर, सोशल मीडिया, पश्चिम बंगाल निवडणुका

फोटो स्रोत, Tushar Kulkarni

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर कंगनाने ट्वीटरच्या माध्यमातून त्यावर भाष्य केलं होतं.

बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या बातम्यांसंदर्भातही ती बोलली होती. बंगाल व्हॉयलेन्स या हॅशटॅगसह तिने लिहिलं की 'ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे.'

पश्चिम बंगालमध्ये काय घडलं?

पोलिसांनुसार पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचे निधन झाले आहे ते लोक कोणत्या पार्टीचे होते याबद्दल पोलिसांनी काहीच सांगितले नाही.

पश्चिम बंगाल

भाजपचा दावा आहे की 12 पैकी किमान 6 लोक तृणमूल काँग्रेसकडून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडले आहेत. तृणमूल काँग्रेसने हा दावा फेटाळला आहे. अंतर्गत कलहातून हा हिंसाचार झाला असावा असा तृणमूलचा दावा आहे.

ट्विटरचे नियम काय आहेत?

चिथावणीखोर वक्तव्य केल्यास ट्विवटर अकाउंट रद्द केलं जातं. ट्विटरने यांसदर्भात नियम सांगितले आहेत.

"एखाद्या विषयावर खुलेपणाने बोलता यावं हा ट्विटरचा हेतू आहे. हिंसा, शोषण आणि अशा स्वरुपाच्या आक्षेपार्ह वर्तनामुळे लोकांना बोलण्यापासून परावृत्त केलं जातं. यामुळे जागतिक संवादाचं व्यासपीठ ही संकल्पनाच मोडीत निघते. आमच्या नियमाप्रमाणे सर्व युझर्सनी खुलेपणाने चर्चेत सहभागी व्हावं आणि मोकळेपणाने बोलावं," असा ट्विटरचा नियम आहे.

यापूर्वीही कंगना राणावतच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती, पण ती तात्पुरती होती. अॅमेझॉन प्राईमवर 'तांडव' ही वेबसीरिज रिलीज झालयानंतर कंगनाने आता 'आता शिरच्छेद करण्याची वेळ आली आहे,' अशा आशयाचं ट्वीट केलं होतं. त्यानंतर तिच्या अकाऊंटवर ट्विटरकडून काही निर्बंध घालण्यात आले होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)