कंगना राणावत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडोंवर का भडकली?

कंगना-ट्रुडो

फोटो स्रोत, Getty Images

फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला. मात्र, काही समाजांना मनमानी पद्धतीने आणि विनाकारण दुखवायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं.

फ्रान्सच्या 'शार्ली एब्दो' मासिकात पैगंबर मोहम्मद यांचं व्यंगचित्र छापण्याच्या अधिकारासंबंधी प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

त्यांनी म्हटलं, "आपण कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करायला हवं. मात्र, अभिव्यक्ती स्वाातंत्र्यालाही मर्यादा असतात. आपण इतरांचा सन्मान करत काम करायला हवं आणि ज्यांच्यासोबत आपण या समाजात आणि जगात राहतो त्यांना विनाकारण दुखावण्याची गरज नाही."

पंतप्रधान ट्रुडो यांनी पुढे म्हटलं की, गर्दीने भरलेल्या चित्रपटगृहात 'आग, आग' ओरडण्याचा अधिकार आपल्याला नाही. प्रत्येक अधिकाऱ्याच्या मर्यादा असतात.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर दिला होता. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सावधगिरीने वापर करायची गरज असल्याचं म्हटलं आहे.

"आपल्यासारख्या बहुलतावादी आणि सन्मानजनक समाजात आपण आपले शब्द, आपल्या कामाने इतरांवर होणारा परिणाम समजून घ्यावा लागेल. विशेषतः त्या समाज आणि लोकांवर जे आजही मोठ्या प्रमाणावर भेदभावाचा सामना करत आहेत."

याचवेळी ते समाज या मुद्द्यांवर जबाबदारीने सार्वजनिक चर्चा करण्यास तयार असल्याचंही म्हणाले. तसंच फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेध करत दुःख व्यक्त केलं.

याविषयी बोलताना ते म्हणाले, "हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि कॅनडा कठीण काळातून जाणाऱ्या आपल्या फ्रेंच मित्रांच्या पाठीशी उभं राहत या घटनेचा निषेध करतो."

फ्रान्सच्या नीसमध्ये एका चर्चवर झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याच्या घटनेवर कॅनडाच्या संसदेत गुरूवारी (29 ऑक्टोबर) दुःख व्यक्त करत मौन पाळण्यात आलं.

कंगना का भडकली?

जस्टीन ट्रुडो यांच्या प्रतिक्रियेवर कंगणा राणावतने काही ट्वीट करत प्रश्न विचारले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

कंगणा लिहिते, "प्रिय जस्टीन, आपण एका आदर्श जगात राहत नाही. लोक रोज सिग्नल तोडतात, ड्रग्ज घेतात, अत्याचार करतात आणि इतरांच्या भावना दुखावतात. प्रत्येकच छोट्या-छोट्या गुन्ह्यांची शिक्षा एकमेकांचा गळा कापणं असेल तर आपल्याला पंतप्रधान आणि कायदा-सुव्यवस्थेची गरजच काय?"

कंगनाने जस्टीन ट्रुडो यांना टॅग करत त्यांना उत्तर मागितलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलं आहे, "कुणीही राम, कृष्ण, दुर्गा किंवा इतर कुठलाही ईश्वर - अल्लाह, ईसा मसीहा- यांचं व्यंगचित्र काढत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. वर्कप्लेस किंवा सोशल मीडियावर कुणी असं काही करत असेल तर त्याला रोखलं पाहिजे. सार्वजनिकरित्या करत असेल तर सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे. एवढंच. लोकांना नास्तिक होण्याचा अधिकार आहे."

"मी ईश्वर मानत नाही आणि हे निवडण्याचा मला अधिकार आहे. हे योग्य आहे. हा काही गुन्हा नाही. तुमच्या धर्माशी मी का असहमत आहे, हेसुद्धा मी सांगू शकते. हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे."

फ्रान्समध्ये 'शार्ली एब्दो'मध्ये छापलेले व्यंगचित्र वर्गात दाखवल्यामुळे एका शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यु्ल मॅक्रॉन यांनी व्यंगचित्र छापण्याच्या अधिकाराचा बचाव केला आणि शिक्षकावर झालेला हल्ला इस्लामिक कट्टरतावाद असल्याचं म्हटलं होतं.

काही मुस्लीम देशांमध्ये मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कारही टाकण्यात आला. यानंतर फ्रान्समधल्या एका चर्चवर हल्ला झाला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)