You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : ऑक्सिजन संपल्याने दिल्लीतल्या बात्रा हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांचा मृत्यू
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतल्या बात्रा हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांचा जीव गेलाय.
दगावणाऱ्यांमध्ये या हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाच्या प्रमुखांचाही समावेश आहे.
आज सकाळपासून या हॉस्पिटलकडून ऑक्सिजनसाठीची मदत मागितली जात होती. आपल्याकडचा ऑक्सिजन संपत आला असून तातडीने मदतीची गरज असल्याचं या हॉस्पिटलने दिल्ली उच्च न्यायालयाही कळवलं होतं.
बात्रा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं, "सकाळी 6 वाजल्यापासून आमच्याकडे आणीबाणीची परिस्थिती आहे. आमच्याकडे 307 रुग्ण आहेत, त्यापैकी 230 जण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत."
या दुर्घटनेविषयी बीबीसीशी बोलताना बात्रा हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुधांशू बंकाटा म्हणाले, "या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली होती. अशा रुग्णांना नंतर वाचवणं अशक्य असतं. पुढचे 24 तास आव्हानात्मक असू शकतात आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. सध्या बात्रा हॉस्पिटलमध्ये 200 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत."
दरम्यान, दिल्लीत ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असून अनेक दवाखान्यांनी आपत्कालीन इशारा देत मदत मागितल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, "आम्ही न्यायालय आणि केंद्र सरकारला सांगितलंय की, आम्हाला दररोज 976 टन ऑक्सिजनची गरज आहे. पण आम्हाला फक्त 490 टन ऑक्सिजन देण्यात आलाय. काल तर आम्हाला फक्त 312 टन ऑक्सिजन मिळाला. अशानं कसं चालणार?"
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)