कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू, ICU जळून खाक

गुजरातमधल्या भरूच शहरातल्या कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास पटेल वेल्फेअर रुग्णालयात आग लागली.
आयसीयू विभागात ही आग लागल्याचं रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितलं. काही रुग्णांवर व्हेंटिलेटरच्या माध्यमातून उपचार सुरू होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आग लागून संपूर्ण आयसीयू विभागात पसरली असं बीबीसीच्या गुजराती सेवेचे भरूच प्रतिनिधी साजिद पटेल यांनी सांगितलं.
रुग्णालयाला आग लागल्याचं कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत आयसीयू विभागाचा दरवाजा वेढला गेल्याने खिडक्या तोडून अडकलेल्या माणसांची सुटका करण्यात आली.
आतापर्यंत या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, BB/Sajid Patel
या दुर्घटनेतून सुटका करण्यात आलेल्या रुग्णांना अल महमूद रुग्णालय, भरूच सिव्हिल रुग्णालय, सेवाश्रम रुग्णालय, गुजरात हॉस्पिटल अशा ठिकाणी हलवण्यात आलं.
कोव्हिडची सर्वसाधारण लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांवरही उपचार सुरू झाले आहेत.
आयसीयू विभाग जळून खाक
आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अथक मेहनतीनंतर अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत आयसीयू विभाग जळून खाक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दुर्घटनेची बातमी कळताच भरूच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.

भरूचचे पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंह चुडासमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.
रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची माहिती घेतल्यानंतरच मृतांचा आकडा कळू शकेल असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








