Exit Poll 2021 : बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर तामिळनाडूमध्ये द्रमुक बाजी मारणार, एक्झिट पोल्सचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. यासाठीचे एक्झिट पोल्स आज जाहीर झाले आहेत.
एकूण 294 जागांपैकी 156 जागा मिळवत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता राखतील, पण भाजपलाही इथे 121 जागा मिळण्याचा अंदाज NDTV ने त्यांच्या 'पोल ऑफ पोल्स' म्हणजे सगळ्या पाहण्यांच्या पाहणीमध्ये म्हटलं आहे.
सहा पाहण्यांच्या सरासरीमधून NDTV ने हे निवडणूक अंदाज मांडले आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या विरोधीपक्ष असणारा द्रमुक पक्ष बाजी मारण्याचा अंदाज यात मांडलाय.
तर आसाममध्ये काँग्रेसची निराशा होण्याची शक्यता असल्याचं तर केरळमध्ये डाव्या आघाडीचा विजय होण्याची शक्यता असल्याचं या पोल ऑफ पोल्समध्ये म्हटलंय.
निवडणूक होत असलेली पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्यं म्हणून ओळखली जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे.
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती.
पण पश्चिम बंगालमधली लढत ही सगळ्यात लक्षवेधी ठरण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पश्चिम बंगाल एक्झिट पोल
एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधासभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे. इथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष बाजी मारेल असा अंदाज रिपब्लिक टीव्ही वगळता इतर बहुतेक माध्यमांच्या एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे.
एबीपी - सी व्होटर
तृणमूल काँग्रेस : 152-164
भाजप : 109-121
काँग्रेस - डावी आघाडी : 14-25
CNN न्यूज 18
तृणमूल काँग्रेस : 162
भाजप : 115
काँग्रेस - डावी आघाडी : 15
रिपब्लिक टीव्ही - CNX
तृणमूल काँग्रेस : 128-138
भाजप : 138-148
काँग्रेस - डावी आघाडी : 11-21

फोटो स्रोत, PTI
तामिळनाडू एक्झिट पोल
तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक (AIADMK) आणि विरोधी द्रमुक पक्ष (DMK) आमनेसामने आहेत. इथे एकाच टप्प्यात संपूर्ण मतदान झालं.
234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 118 जागांचा पल्ला महत्त्वाचा आहे.
सध्या विरोधी पक्ष असणारा द्रमुक पक्ष इथे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं एक्झिट पोल्सनी म्हटलंय.
रिपब्लिक टीव्ही - CNX
अण्णाद्रमुक (AIADMK) : 58-68
द्रमुक : 160-170
AMMK आघाडी : 4-6
P-Marq
अण्णाद्रमुक (AIADMK) : 40-65
द्रमुक :165 - 190
AMMK आघाडी : 1-3

फोटो स्रोत, PINARAYI VIJAYAN TWITTER
केरळ एक्झिट पोल
एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार केरळमध्ये डाव्या आघाडीची पुन्हा सत्ता येणार असल्याचं दिसतंय. केरळमध्ये 140 जागांची विधानसभा असून बहुमतासाठी 71 जागांची गरज आहे.
इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया
डावी आघाडी : 104-120 संयुक्त लोकशाही आघाडी : 20-36 एनडीए : 0-2 रिपब्लिक - CNX
डावी आघाडी : 72-80 संयुक्त लोकशाही आघाडी : 58-64एनडीए : 1-5
एबीपी - सी व्होटर
डावी आघाडी : 71 - 77 संयुक्त लोकशाही आघाडी : 62-68भाजप : 0-2

फोटो स्रोत, Getty Images
आसाम एक्झिट पोल
आसाममध्ये 126 जागांची विधानसभा असून बहुमतासाठी 64 जागांची गरज आहे. काही एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू अवस्थेचा तर काही एक्झिट पोल्समध्ये भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एबीपी - सी व्होटर एनडीए : 58-71 काँग्रेस + : 53-66इतर : 0-5इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाभाजप आघाडी : 75-85काँग्रेस आघाडी : 40-50 इतर : 1-4रिपब्लिक टीव्ही-सीएनएक्सभाजप आघाडी : 74-84काँग्रेस आघाडी : 40-50इतर : 1-3
पुद्दुचेरी एक्झिट पोल
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत.
रिपब्लिक-सीएनएक्स
एनडीए : 16-20एसडीए : 11-13इतर : 0एबीपी-सी व्होटर
एनडीए : 19-23एसडीए : 6-10इतर : 1-2
आसाममधल्या 126, केरळमधील 140, तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294 तर पुद्दुचेरीमधल्या 30 जागांसाठी या निवडणुकांमध्ये मतदान झालं.
या पाचही राज्यांची मतमोजणी 2 मे रोजी होऊन निकाल लागतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








