पश्चिम बंगाल निवडणूक: ममता बॅनर्जी म्हणतात, 'मला नंदीग्रामची नाही, तर लोकशाहीची चिंता'

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालमध्ये आज (1 एप्रिलला) 30 विधानसभा जागांवर दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात 24 परगणा भाग-1, बांकूरा भाग-2, पश्चिम मिदनापूर भाग-2 आणि पूर्व मिदनापूरमध्ये मतदान पार पडलं.
मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात 80 टक्के मतदान झालं असून नंदीग्राममध्ये 80.79 टक्के मतदान झालं आहे. हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण, नंदीग्रामचा संग्राम ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा होणार आहे.
आज मतदानाच्या दिवशी नंदीग्राममध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. नंदीग्राम इथल्या एका मतदान केंद्रावर भाजपनं घोळ केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला.
या आरोपांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: बायल इथल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत.
ममता बॅनर्जी यांच्यानंतर शुभेंदू अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचले.
यावेळी ते म्हणाले, "ममता बॅनर्जी यांना कुणाचाच पाठिंबा नाहीये. त्यांनी निवडणूक हरली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर सडकून टीका केली आहे.
त्यांनी म्हटलं, "आम्ही निवडणूक आयोगाकडे 63 तक्रारी केल्या आहेत. मला नंदीग्रामची चिंता नाही, तर लोकशाहीची चिंता आहे. मी 'मा माटी मानूष' यांच्या आशीर्वादानं नंदीग्राममधून निवडून येणार आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

फोटो स्रोत, PM Tewari
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं.
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी जयनगर इथं एक प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या या पत्राविषयी म्हटलं, "या निवडणुकीत पराभव होईल या भीतीमुळेच ममता बॅनर्जी इतर पक्षातील नेत्यांकडे मदतीची याचना करत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर त्यांचे एकेकाळचे सर्वात विश्वासू शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान असणार आहे.
ममता बॅनर्जींसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची मानली जातेय. भाजपला थेट आव्हान देण्यासाठी ममतांनी आपला पारंपारिक गड सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ममता यांनी नंदिग्राममध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी 2007 मध्ये नंदीग्राममध्ये आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. या आंदोलनाची रणनिती शुभेंदू अधिकारी यांनी तयार केली होती. मात्र, त्याच नंदीग्राममध्ये शुभेंदू आता ममता यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शुभेंदू अधिकारी यांच्यासाठी ममतांनी गेली दोन निवडणुका मतं मागितली. मात्र, या निवडणुकीत त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात प्रचार केला.
नंदीग्रामची टक्कर
नंदीग्राममध्ये 27 टक्के मुसलमान मतदार आहेत तर बाकी हिंदू.
रविवारपासून सलग दोन दिवस ममता यांनी नंदीग्राममध्ये रोड शो आणि रॅली केली. भाजप नेत्यांवर ममता यांनी जोरदार हल्ला केला.
राजकीय जाणकारांच्या सांगण्यानुसार, गेली 14 वर्षं जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात धर्माच्या नावावर मोठं ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येत आहे.
ममता टीएमसचीच्या एकट्या स्टार प्रचारक आहेत. नंदीग्राममध्ये ममता अडकून पडल्याने इतर ठिकाणी त्यांना निवडणूक प्रचारासाठी फिरता येत नाहीये.
ममता यांच्या बाजूचे आणि विरोधातील मुद्दे
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक प्रचारादरम्यान ममता नंदीग्रामच्या लोकांसोबत भावनिक संबंध बनवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी 2007 मध्ये झालेल्या आंदोलनाला शेतकरी आंदोलनाशी जोडलं.
पीरजादा अब्बासी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर फ्रंटने नंदीग्रामध्ये उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे मुसलमान मतं फुटण्याची भीती जास्त नाही. तर, ममता यांनी हिंदू बहुल परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन त्या हिंदूविरोधी नाहीत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे.
पण, नोकरी आणि विकास यांसारखे मुद्दे ममता यांच्या विरोधात आहेत.
आसाममध्ये दुसरा टप्पा
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 39 जागांवर निवडणुका होणार आहेत. 345 उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बराक व्हॅलीमधील 13 जिल्हे, डोंगराळ भागातील तीन जिल्हे आणि मध्य आसाममध्ये मतदान पार पडलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)