राहुल गांधी यांच्यासाठी दक्षिण भारत ही नवी संधी की अवघड राजकारणापासूनचं पलायन?

राहुल गांधी

फोटो स्रोत, Inc

फोटो कॅप्शन, राहुल गांधी
    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राहुल गांधींनी अरबी समुद्रात सूर मारला, समुद्राच्या लाटा कापत ते आरामात पोहत होते. राहुल गांधीच्या सोबत असलेले केरळमधील कोळी बांधव हे पाहून हैराण झाले.

तामिळनाडूत राहुल गांधींपेक्षा अर्ध्या वयाच्या एका मुलीने त्यांना फिटनेस चॅलेंज दिलं. ते चॅलेंज स्वीकारून त्यांनी आपल्या शरीराचा फिटनेस दाखवून दिला.

अशा प्रकारे गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर राहुल गांधी यांचीच चर्चा होती. या सगळ्या बातम्या येत होत्या दक्षिण भारतातून.

त्याशिवाय, वृत्तपत्रं आणि टीव्ही अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमांमध्ये राहुल गांधी यांच्या दक्षिण भारत दौऱ्याचं चांगलंच कव्हरेज झालं. उत्तर भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये राहुल गांधींची चर्चा अशा प्रकारे अत्यंत कमी प्रमाणात होते.

या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केल्यास 50 वर्षीय राहुल गांधी दक्षिण भारतातील सगळी राज्यांतील नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहेत.

येथील केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत. या लोकांसाठी राहुल गांधी हे कुणी वेगळे आहेत, असं यातून जाणवलं नाही.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Inc

राहुल गांधी यांचा दौरा आणि त्यामध्ये त्यांनी केलेल्या गोष्टींना माध्यमांमध्ये जागा मिळाली असली तरी काही माध्यम विश्लेषकांना याचं नवल वाटत नाही. काही विश्लेषक तर यापेक्षा वेगळं मत नोंदवतात. त्यांच्या मते दक्षिण भारतातील राजकारण हे एक प्रकारे राहुल गांधींचं अवघड राजकारणापासूनचं पलायन आहे.

भारतातील पहिल्या स्थानिक टेलिव्हिजन चॅनेलचे संस्थापक शशि कुमार सांगतात, "राहुल यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. स्थानिक वृत्तवाहिन्या लोकांमध्ये चर्चेचं कारण ठरू शकतात."

इतर कारणं

माध्यमांनी राहुल गांधीबद्दल घेतलेल्या भूमिकेला काही इतर कारणंही आहेत.

द हिंदू वृत्तपत्राचे माजी मुख्य संपादक एन. राम यांच्या मते, "दक्षिण भारतातील राजकारण उत्तर प्रदेशपेक्षा वेगळं आहे. इथलं राजकारण थोडं कमी विषारी आहे. इथं हिंदुत्वाचं बेलगाम राजकारण होत नाही. याठिकाणचं राजकारण असभ्य स्वरुपाचं नाही."

राहुल गांधी

फोटो स्रोत, Inc

शशि कुमार सांगतात, "इथं काँग्रेसचं अस्तित्व आहे म्हणून नाही. पण दक्षिण भारतात भाजपचंच कर्नाटक वगळता कुठेच भाजपचं अस्तित्व नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच राहुल गांधी माध्यमांमध्ये दिसतात."

"राहुल समुद्रात पोहू शकतात, पुशअप्स मारू शकतात, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत अधिक फिट आहेत. पण नरेंद्र मोदी यांनीच राजकारणात शारिरिक सामर्थ्याबाबत सर्वप्रथम चर्चा केली होती. त्यांनीच 56 इंची छातीबद्दल वक्तव्य केलं होतं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

एन. राम सांगतात, "राहुल गांधी तामिळनाडूमध्ये जास्त आनंदी दिसतात. इथं त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती. पण राहुल गांधी या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेले आहेत. त्यांच्या मनात त्याबद्दल असुया नाही. आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या तुलनेत राहुल गांधी हेच तामिळनाडूत जास्त एकरून दिसतात."

राजकीय विश्लेषक बी. आर. पी. भास्कर यांच्या मते, "अमेठीत झालेला पराभव आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून मिळालेल्या विजयामुळेच राहुल गांधींचे दक्षिण भारत दौरे वाढले आहेत."

"राजकारणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. नेहरू-गांधी कुटुंबाला इथून मोठा पाठिंबा होता. हाच पाठिंबा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस पक्ष आपली पकड गमावू शकतो. पण नेहरू-गांधी कुटंबाला ही पकड मिळवता येऊ शकते," भास्कर सांगतात.

राहुल गांधी यांची 'कूल' प्रतिमा

नक्कीरन मॅगझिनचे के. दामोदरन प्रकाश यांच्या मते, "तमीळ माध्यमांची राहुल गांधी यांच्याबद्दलची भूमिका सकारात्मक राहिली आहे. इतकंच नव्हे तर त्यांना तामिळनाडूचाच पुत्र अशा स्वरुपात पाहिलं जातं. राहुल गांधी यांना 'कूल' व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. पण गृहमंत्री अमित शाह यांना याठिकाणी खलनायक म्हणून पाहिलं जातं. संपूर्ण तामिळनाडूमध्ये हीच परिस्थिती आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Inc

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलुगू राज्यांमध्येही राहुल गांधीबद्दलचं मत अशाच स्वरुपाचं आहे.

हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीतील पत्रकारिता विषयाच्या माजी प्राध्यापक पद्मजा शॉ म्हणतात, "उत्तर भारतातील मीडियामध्ये राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जातो. पण इथं असं नाही. इथल्या सत्ताधारी प्रादेशिक पक्षांना कुणाचाही धोका नाही हे इंग्रजी माध्यमांना माहीत आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ज्येष्ठ पत्रकार जिंका नागार्जून सांगतात, "तेलुगू माध्यमांमध्ये राहुल गांधींच्या जास्त बातम्या प्रसिद्ध होत नाहीत. पण जितक्या प्रसिद्ध होतात, त्या सकारात्मक असतात. राहुल गांधी तरुणांसोबत करत असलेली चर्चा ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने दाखवली जाते."

उदयवाणी या कन्नड वृत्तपत्राच्या माजी संपादक पूर्णिमा आर. याबाबत सांगतात, "कन्नड माध्यमांमधील राहुल गांधीचं चित्रण राष्ट्रीय माध्यमांप्रमाणेच असतं. 2014 नंतर कन्नड माध्यमांमध्ये राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाची टीका होताना दिसते."

केरळच्या वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांचा दक्षिण भारतातला वावर वाढला आहे. यामुळे काँग्रेसचा फायदाच झालेला आहे. स्थानिक माध्यमांसाठीही राहुल गांधी महत्त्वाचे आहेत.

एन. राम याबद्दल सांगतात, "राहुल गांधी सबरीमाला प्रकरणात आपल्या नेत्यांची वक्तव्य रोखण्यात अयशस्वी ठरले. त्यांचं येथील राजकारण म्हणावं तितकं मोठं झालेलं नाही."

राहुल गांधी

फोटो स्रोत, Inc

काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगितल्या.

"इथं सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी राहुल गांधी यांना विचारली जातात. राहुल गांधींबद्दल माध्यमांची भूमिका पक्षपाती आहे," असं ते म्हणाले.

इंडिया जर्नलिझ्म रिव्ह्यूचे संपादक कृष्णा प्रसाद सांगतात, "राहुल गांधी हे सचिन तेंडुलकरप्रमाणे आहेत. सचिन तेंडुलकर बोलण्याऐवजी खेळण्यावर जास्त विश्वास ठेवायचे. राहुल गांधी यांच्यासाठी दक्षिण भारतातील गुंतागुंतीचं राजकारण हे आव्हान आहे.

"राहुल गांधी यांची राजकारणाची शैली ही अमेरिकेसारखी आहे. सहा वर्षांपूर्वी भाजपने खेळलेला डावच काँग्रेस आता खेळत आहे. माध्यमांनी राहुल गांधींना पप्पू ही प्रतिमा दिली. पण राहुल गांधी यांनी मजबुतीने राजकारण केलं. राहुल गांधी यांचा राजकीय अनुभव अजून कमी आहे. त्यांच्या नव्या राजकारणाला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."

राहुल गांधी हे आता राजकारणात परिपक्व झाले आहेत, असं शशि कुमार यांना वाटतं. ते म्हणतात, ही राहुल गांधी यांची स्वतःची शैली आहे. नवीन पीढी दिखाऊपणाच्या राजकारणाने प्रभावित होत नाही. हेच राहुल गांधी सांगत आहेत."

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )