कोरोनाची लस आता 250 रुपयांत खासगी रुग्णालयात मिळणार

मुंबई लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE

कोरोनाची लस आता खासगी हॉस्पिटलमध्येही उपलब्ध असेल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबत माहिती दिली.

आयुष्यमान भारतशी संलग्न असलेले देशातील 10 हजार हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील 687 रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाईल.

कोविन 2.0 अॅपच्या वापराबाबत युजरनेम आणि पासवर्ड खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये देणाऱ्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 250 रुपये असेल.

येत्या 1 मार्च 2021 पासून 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येईल, तसेच 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल.

राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजनेशी संलग्न असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्येही लस दिली जाऊ शकते. याबाबत निर्णयाचं राज्य सरकारला स्वातंत्र्य देण्यात आलं आहे.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा देखील कोव्हिड लसीकरण केंद्र म्हणून वापर करता येईल. तसंच, सरकारी कंपन्यांनाही (Public Sector Units) कोव्हिड लसीकरण केंद्र म्हणून वापरता येईल

सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लस दिली जाईल आणि त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे.

कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील 13 प्रश्नांची सविस्तर उत्तरं

16 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. भारत सरकारने या देशव्यापी लसीकरण मोहीमेसाठी अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद केली आहे.

देशामध्ये सध्या 2 लशींच्या मदतीने लसीकरण सुरू झालेलं आहे आणि यासोबतच येत्या 6 महिन्यांत आणखीन 2 लशी उपलब्ध होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितलं.

ही लसीकरण मोहीम, लशीची उपयुक्तता आणि सुरक्षितता, ही लस कोणाला मिळणार या सगळ्याविषयीची वेगवेगळी चर्चा सध्या सुरू आहे. म्हणूनच लशीविषयीच्या सर्व प्रश्नांची ही उत्तरं.

1. लस कोणाला मिळणार?

या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे.

त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि इतर व्याधी असणाऱ्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना लस देण्यात येईल. भारतात असे 27 कोटी लोक आहेत.

कोरोना लसीकरण

फोटो स्रोत, SOPA IMAGES

सगळ्यात आधी आरोग्यसेवा कर्मचारी म्हणजेच डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिक्स आणि आरोग्य यंत्रणेशी संबंधित लोकांना लस दिली जाईल. या सगळ्यांची संख्या 80 लाख ते 1 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातंय.

त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स - म्हणजेच राज्यातले पोलीस कर्मचारी, पॅरामिलिटरी फोर्सेस, लष्कर, सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या गटाची संख्या जवळपास 2 कोटी आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील 1.26 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे.

राज्यातल्या लसीकरणाबद्दल बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "साधारणपणे 11 कोटीतल्या 3 कोटी लोकांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये लस देण्याच्या संदर्भात भारत सरकारसोबतचं नियोजन करण्यात आलेलं आहे."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

राज्यात 3 गटांचं प्राधान्याने लसीकरण केलं जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.

पहिला गट : शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलंय.

दुसरा गट : फ्रंटलाईन वर्कर्स. यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय.

तिसरा गट : 50 वर्षावरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत अशा 50 वर्षाखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.

दुसऱ्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे.

तर लस घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काऊन्सेलिंग करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी :

2. भारतात कोणत्या लशी वापरणार?

भारतामध्ये ऑगस्ट 2021पर्यंत पहिल्या टप्प्यात 60 कोटी लोकांना लस दिली जाईल अशी आशा व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली होती.

'कोव्हिशील्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लस वापरून भारतात लसीकरण करण्यात येत आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाची लस भारतात कोव्हिशील्ड नावाने उपलब्ध आहे.

तर कोव्हॅक्सिन ही हैदराबादची भारत बायोटेक कंपनी आणि ICMR ने मिळून विकसित केलेली स्वदेशी लस आहे.

कोरोनाची लस टोचून घेणं हे ऐच्छिक असेल. लस टोचून घ्यायची की नाही, हे प्रत्येक व्यक्ती ठरवू शकते. इतर देशांमध्ये विकसित केलेल्या लशीइतकीच भारतात विकसित केलली लस परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचा दावाही आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी तिचे दोन डोस घ्यावे लागतील.

सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकॉव्ह बी आणि रशियाची स्पुटनिक 5 या चार लशी भारतात उपलब्ध होतील कारण या चार लशी साठवण्यासाठी हे तापमान सुयोग्य आहे.

भारतामध्ये लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येत असून इथे 2 ते 8 अंश सेल्शियस तापमानामध्ये लशी साठवून ठेवता येणार असल्याचं व्ही. के. पॉल यांनी म्हटलं होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

फायझरच्या आणि मॉडर्नाच्या लशी साठवण्यासाठी अति-थंड तापमानाची गरज आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना व्ही के पॉल म्हणाले, "सध्यातरी 2021 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत मॉडर्ना किंवा फायझरच्या लशींचा भारताला पुरवठा होणं अपेक्षित नाहीय. आम्हाला मॉडर्नाबरोबर त्यांची लस भारतात उपलब्ध करून देण्यासंदर्भात काम करायला आवडेल. भारतासाठी तसंच इतर देशांसाठीही त्या लशीचं भारतात उत्पादन व्हावं यासाठीही काम करायला आवडेल. आम्ही हेच फायझरलाही सांगितलं आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत."

3. मुंबईत लसीकरणासाठी किती सेंटर आहेत?

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील 1.26 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे.

या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती Covid Vaccine Intelligence Work म्हणजेच 'CO-VIN' या अॅपवर अपलोड करण्यात आली आहे.

कोरोना, मुंबई, लसीकरण, लस

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पालिकेने 8 केंद्र तयार केली आहेत.

  • मुंबई महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालयं- केईएम, नायर, सायन, कूपर
  • इतर पालिका रुग्णालयं- घाटकोपरचं राजावाडी, बांद्रा भाभा, शताब्दी आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे.

मुंबईच्या लसीकरण मोहीम टास्सफोर्सचे प्रमुख मुंबई महापालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "या आठ सेंटरमध्ये कोव्हिड-19 विरोधी लशीचे 10 लाख डोस ठेवण्याची क्षमता आहे. येत्या 2-3 दिवसात लस साठवण्याची क्षमता 90 लाखांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे."'

"पहिल्या टप्प्यानंतर महापालिकेचे दवाखाने, जंबो रुग्णालयं आणि इतर पालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. लसीकरण केंद्रांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात येणार आहे," असं ते पुढे म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये आरती ओवाळून आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लस घेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. कूपर हॉस्पिटल लसीकरणाचं केंद्र आहे.

4. महाराष्ट्रात लसीकरण कसं होतंय?

महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी एक सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.

सरकारीच्या आखणीनुसार लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून ही लस चार मोठ्या कोल्ड स्टोअरेज केंद्रांमध्ये (कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता) पोहोचवली जाईल. तिथून पुढे ही लस राज्यांतर्फे चालवण्यात येणाऱ्या 37 स्टोअर्समध्ये पाठवण्यात येईल.

त्यानंतर ही लस जिल्हा पातळीवर पाठवण्यात येईल.

कोरोना लस भारतात कोणत्या पद्धतीने सर्वांना दिली जाईल, याबाबत केंद्र सरकारने एक नियमावली 14 डिसेंबरला जाहीर केली होती.

कोरोना, मुंबई, लसीकरण, लस

यानुसार एका वेळी एकाच व्यक्तीला लसीकरण केंद्रात जाण्यासाठी परवानगी असेल. राज्यांना दिलेल्या या सूचनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगण्यात आलंय.

लस घेणाऱ्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लसीला ट्रॅक करण्यासाठी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. लसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत लोकांनाच लस दिली जाईल. त्यासाठीची प्राथमिकता ठरवण्यात येईल.

कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीच्या लशी उपलब्ध होतील, त्यानुसार नियोजन करण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.

कोव्हिड व्हॅक्सीन ऑपरेशनल गाईडलाईन्सनुसार, लस असलेला बॉक्स, बाटली किंवा आईस-पॅक थेट सूर्यकिरणाच्या संपर्कात येऊ नये. यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं केंद्राने म्हटलं आहे.

लस टोचून घेण्यासाठी व्यक्ती आल्यानंतरच ती लस साठवलेल्या ठिकाणाहून बाहेर काढली जाईल.

कोरोना, मुंबई, लसीकरण, लस

या नियमावलीनुसार, "प्रत्येक सत्रात 100 जणांना लस दिली जाईल. संबंधित लसीकरण केंद्रात प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण केंद्र, जास्त व्यक्तींना थांबण्याची व्यवस्था, तसंच मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याची व्यवस्था असेल, तर तिथं आणखी एक लसीकरण अधिकारी तैनात केला जाईल. त्यानंतर तिथं लसीकरण क्षमता 200 पर्यंत वाढवता येऊ शकेल."

लसीकरण उपक्रमातील पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं नियोजन असल्याचं नियमावलीमध्ये सांगितलं आहे.

5. लसीकरण प्रक्रिया कशी असेल?

कूपर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राच्या प्रमुख डॉ. अनिता शेणॉय सांगतात, लसीकरण केंद्राचं चार भागात विभाजन करण्यात आलंय.

  • सिक्युरिटी चेक आणि वेटिंग एरिया
  • ओळख पटवण्यासाठी डेस्क
  • लसीकरण करण्यात येणारी रूम
  • ऑब्झर्वनशन रूम (निरीक्षण केंद्र)

पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला लस देण्यात येणार आहे. त्याची यादी एक दिवस आधी लसीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांना देण्यात येईल.

  • लस देण्यात येणाऱ्या व्यक्तीला मेसेज येईल
  • मेसेज सिक्युरिटी चेकवर दाखवावा लागेल
  • ओळख पटवण्यासाठी आधार-लिंक मोबाईलवर ओटीपी येईल
  • ओळख पटल्यास लस घेण्यासाठी जाता येईल
  • लस घेतल्यानंतर अर्धातास निरीक्षण रूममध्ये थांबावं लागेल

6. लस साठवणार कशी?

सरकारीच्या आखणीनुसार लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून ही लस चार मोठ्या कोल्ड स्टोअरेज केंद्रांमध्ये (कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता) पोहोचवली जाईल. तिथून पुढे ही लस राज्यांतर्फे चालवण्यात येणाऱ्या 37 स्टोअर्समध्ये पाठवण्यात येईल.

त्यानंतर ही लस जिल्हा पातळीवर पाठवण्यात येईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

कोरोनाविरोधी लशीना 2 ते 8 डीग्रीपर्यंतच्या तापमानात ठेवावं लागणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने कांजुरमार्गमध्ये 5000 स्वेअर फुटांचं व्हॅक्सिन सेंटर बनवलं आहे.

लसीकरण मोहीमेच्या टास्क फोर्सचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "कांजुरमार्गमध्ये दोन वॉक-इन कूलर्स आणि 1 फ्रिझर असणार आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोनाविरोधी लशी साठवून ठेवता येतील."

कांजुरमार्गच्या सेंटरमध्ये असलेल्या कूलर्सची क्षमता 1 कोटी पेक्षा जास्त डोस ठेवण्याची आहे.

मुंबईतलं एक कोल्ड स्टोरेज

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मुंबईतलं एक कोल्ड स्टोरेज

त्याचसोबत मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आणि एफ-साऊथ वॉर्ड ऑफिसमध्येही लस साठवण्यात येणार आहे.

रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन भावसार सांगतात, "कांजुरमार्गच्या स्टोरेज सेंटरमधून लस वॉर्ड ऑफिसमध्ये येईल आणि त्यानंतर रुग्णालयात पाठवली जाईल. रुग्णालयात Ice-Lined Refrigerators (ILR) मध्ये लस ठेवण्यात येईल. त्यानंतर आईस बॅग असलेल्या बॉक्समधून लसीकरण केंद्रात नेण्यात येईल. लस योग्य तापमानात ठेवण्यासाठी कोल्डचेन तयार करण्यात आली आहे."

कूपर रुग्णालयात एकावेळी लशीचे 40000 डोस साठवण्याची क्षमता असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयातील Ice-Lined Refrigerators (ILR) म्हणजे फ्रीजमध्ये कोव्हिड-19 विरोधी लस साठवून ठेवण्यात येणार आहेत.

लस चोरी होऊ नये यासाठी मुंबई पोलीस सुरक्षा देणार आहेत. बीबीसीशी बोलाताना पोलीस उपायुक्त एस. चैतन्य सांगतात, "ज्या केंद्रात कोव्हिड-19 लस साठवण्यात येईल, त्या केंद्रांना पोलीस सुरक्षा देण्यात येईल. लस घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गाडीसोबत पोलिसांचा एक्सॉर्ट असणार आहे."

कोरोना, मुंबई, लसीकरण, लस

"लस लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचावी यासाठी गरज असल्यास ग्रीन कॉरिडोर करण्यात येईल," असं पोलीस उपायुक्त एस. चैतन्य पुढे म्हणाले.

7. कोविन (C0-WIN) काय आहे?

कोव्हिड 19च्या लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेला मदत करण्यासाठी कोविन (Co-WIN) हे अॅप तयार करण्यात आलंय.

देशभरात लसीकरणासाठीची नोंदणी मतदार याद्यांच्या धरतीवर केली जाईल. त्यांचा वापर करून विविध वयोगटातली लोकं शोधून त्यांची नोंदणी Co-WIN या डिजिटल प्लॅटफॉर्मवर केली जाईल. फक्त यावर नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल. ऑन द स्पॉट नोंदणी केली जाणार नाही.

दर दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांनाच लस दिली जावी. लस दिल्यानंतर त्यांना अर्धा तास तिथेच बसायला द्यावं आणि मॉनिटर करावं तसंच एकावेळी एकाच व्यक्तीला लस टोचावी अशा काही सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये लस घेण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून लोक नोंदणी करू शकतील.

सध्या हे कोविन (Co-WIN) अॅप कोणत्याही अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध नाही. पण याच नावाची काही बनावट अॅप्स मात्र आलेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच याविषयी ट्वीट करत खबरदारीचा इशाराही दिला होता. वाईट हेतू असणाऱ्या काहींनी कोविन अॅपची नक्कल केली असून अशी अॅप्स डाऊनलोड करू नयेत, त्यावर माहिती भरू नये, असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कोविन (Co-WIN) अॅप लाँच होणार असेल, त्यावेळी याविषयीची माहिती लोकांना दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं.

सरकारने या अॅपची अधिकृत घोषणा केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येईल. असंही म्हटलं जातंय की हे अॅप डाऊनलोड करण्यासाठीची लिंक सरकारकडून देशभरात सर्वत्र पाठवली जाईल.

सध्या हे अॅप प्री - प्रॉडक्ट फेजमध्ये आहे. म्हणूनच सर्वसामान्य नागरिक हे अॅप डाऊनलोड करू शकत नाहीत वा त्यावर नोंदणी करू शकत नाहीत. या अॅपचा वापर करण्याचा अधिकार सध्या फक्त सरकारी अधिकाऱ्यांना आहे.

8. कोविन अॅपवर नोंदणी कशी करायची?

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात कोविन अॅपवर नोंदणी करता येईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 5

कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.

ही कागदपत्रं वापरता येतील -

  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅन कार्ड
  • मनरेगा रोजगार कार्ड
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक
  • पासबुक
  • पेन्शनची कागदपत्रं

नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.

ऑथेंटिकेशन करण्यासाठी तीन पर्याय असतील. बायोमेट्रिक, OTP वापरून आणि जन्म तारीख वापरून ऑथेंटिकेशन करता येईल. हे ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यावर या नोंदीच्या पुढे एक हिरवी खूण येईल. पण सेल्फ रजिस्ट्रेशनचा हा पर्याय इतक्यात उपलब्ध होणार नाहीये.

अधिक माहितीसाठी :

9. कोरोनाची लस सुरक्षित आहे का?

कोरोनावरील लस सुरक्षित असावी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ड्रग कंट्रोलर संस्थेला आदेश दिलेत की, लशीला तेव्हाच परवानगी द्यावी, जेव्हा तिने परिणाम आणि सुरक्षेचे मापदंड पार केलेले असतील.

भारतातील लस सुरक्षित असेल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कोरोना लस

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य केंद्रावरच अर्धा तास आराम करावा.

"लस टोचल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर एएनएम किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा," असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 6

10. कोव्हॅक्सिन लस कोणी घेऊ नये?

भारत बायोटेक कंपनी आणि ICMR यांनी तयार केलेली लस कोणी घेऊ नये, यासाठी कंपनीनेच एक 'फॅक्टशीट' प्रसिद्ध केली आहे.

यानुसार खालील व्यक्तींनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये.

  • अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लस घेऊ नये.
  • तुम्हाला ताप असेल तर ही लस घेऊ नका.
  • रक्त पातळ करण्याची गोळी घेत असणाऱ्यांनी किंवा मग ब्लीडिंग म्हणजेच रक्तस्राव होण्याचा त्रास असेल तर ही लस घेऊ नये.
  • रोग प्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्यांनी लस घेऊ नये.
  • रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारी औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी लस घेऊ नये.
  • गरोदर महिलांनी आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये.
  • कोव्हिड 19 साठीची दुसरी लस घेतलेल्या व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये.
  • तुम्हाला आरोग्यविषयक इतर गंभीर समस्या असल्यासही लस घेऊ नये.

11. कोव्हिड 19ची लस लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?

12 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसाठी भारत बायोटेकची लस - कोव्हॅक्सिन वापरण्याची आपत्कालीन परवानगी देण्यात आलेली आहे. सोबतच ड्रग कंट्रोलर जनरलनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या टीनएजर्सवर या लशीची क्लिनिकल ट्रायल घ्यायला परवानगी दिलीय. यासाठी ज्या मुलांना ही लस देण्यात येईल त्यांच्या तब्येतीवर कायम लक्ष ठेवलं जाईल.

भारत बायोटेक लस

फोटो स्रोत, Getty Images / NurPhoto

12. लस आल्यानंतर मास्क वापरण्याची गरज आहे का?

कोरोनावरील लस आल्यानंतरही मास्क वापरत राहिलं पाहिजे. तसंच, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं पाहिजे. हातही स्वच्छ धुतले पाहिजेतच. कोरोनाबाबत आपण आतापर्यंत घेत असलेल्या सर्व खबरदाऱ्या घेत राहिले पाहिजे.

13. कोव्हॅक्सिन लस वादात का आहे?

केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी भारतात निर्माण करण्यात येणाऱ्या भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सीन' लशीला मंजुरी दिली. पण, ही लस प्रभावी, कार्यक्षम आणि वापरासाठी सुरक्षित आहे का? याबाबतचा डेटा उपलब्ध नसल्याने देशी लशीसाठी घाई का? हा प्रश्न उपस्थित केला गेला.

कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातल्या ट्रायलचा डेटा जानेवारी 2021मध्ये लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. ही लस सुरक्षित असून ती घेतल्यानंतर रोग प्रतिकारक शक्तीला चालना मिळत असल्याचं लॅन्सेटने म्हटलंय.

कोरोना, लस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, कोव्हॅक्सिन

ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही, 'कोव्हॅक्सीन' ला मंजुरी दिली. ही लस इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण केली जात आहे.

'कोव्हॅक्सीन'ला मंजुरी देताना ड्रग्ज कंट्रोलर जनरल म्हणाले, 'जनहित लक्षात घेता, लशीला क्लिनिकल ट्रायलमध्येच आपात्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराची परवानगी देण्यात आलीये.'

कोरोना व्हायरस म्युटेट झाला किंवा बदलला तर पर्याय असावेत यासाठी परवानगी देण्यात यावी असं नमुद करण्यात आलं.

क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात 25800 लोकांना या लशीचा डोस देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी 'कोव्हॅक्सीन' सुरक्षित आहे असं म्हटलं असलं. तरी, तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

'चाचणी सुरू असताना लशीला मंजुरी देण्यामागे शास्त्रीय तर्क काय?' असा सवाल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कने उपस्थित केला आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. अनंत भान सांगतात, 'लस किती कार्यक्षम आहे याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. लोकांमध्ये लशीबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची आहे. लशीचा अभ्यास किती लोकांवर करण्यात आला. त्याचे परिणाम काय आले. याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.'

कोव्हॅक्सीनच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईला म्हणाले, "भारतात क्लिनिकल ट्रायल कायद्याप्रमाणे आजार जीवघेणा असल्यास दुसऱ्या टप्प्यात आपात्कालीन मंजुरी दिली जाऊ शकते. माकडांवर करण्यात आलेल्या चाचणीत कोव्हॅक्सीन लस विषाणू विरोधात संरक्षण देऊ शकते असं सिद्ध झालं आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 7

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)