कोरोना : नरेंद्र मोदी याांच्यासोबतच्या बैठकीचं अरविंद केजरीवालांनी केलं लाईव्ह प्रसारण, नाराजीनंतर मागितली माफी

फोटो स्रोत, Ani
भारतातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली होती. पण बैठकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक चूक केली. त्यावर नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्यानं केजरीवालांना त्यांची माफी मागावी लागली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीतील भाषण सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीम करण्यास सुरूवात केली होती. पण नरेंद्र मोदी यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर याचं लाईव्ह प्रक्षेपण थांबवण्यात आलं आणि त्यावर केजरीवाल यांनी माफीही मागितली आहे.
शुक्रवारी (23 एप्रिल) सकाळी नरेंद्र मोदी आणि कोरोनाग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक पार पडली.
या बैठकीत सर्वांचं बोलणं सुरू होतं. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बोलण्याची वेळ आली. पण त्याचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं.

फोटो स्रोत, Ani
यावर नरेंद्र मोदी म्हणाले, "हे आपल्या परंपरेच्या आणि प्रोटोकॉलच्या विरुद्ध होत आहे. मुख्यमंत्र्यांनी इन-हाऊस मिटिंग लाईव्ह करणं हे अपेक्षित नाही. आपण या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे.
केजरीवाल यांनी मागितली माफी
पंतप्रधान मोदी यांनी चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्याची जाणीव झाली.
ते म्हणाले, "ठीक आहे सर, आतापासून याची काळजी घेईन. माझी चूक झाली असेल, काही कठोर बोललो असेल, माझी वागणूक चुकीची असेल, तर मी त्यासाठी माफी मागतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात कोरोनाबाबत नॅशनल प्लॅनची चर्चा केली. ऑक्सिजनच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी ऑक्सिजन टँकर्स थांबवण्यात येत असल्याकडेही लक्ष वेधलं. केजरीवाल यांनी पंतप्रधानांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.
त्यानंतर केंद्र सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने ANI वृत्तसंस्थेने एक बातमी दिली. या बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं अपेक्षित नव्हतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सरकारी सूत्रांनी केजरीवाल यांच्यावर राजकारण करत असल्याचाही आरोप केला आहे. ऑक्सिजन विमानाने आणण्यात यावे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. पण ते आधीपासूनच करण्यात येत आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या सूत्रांच्या मते, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामांचा पाढा वाचला. पण केजरीवाल यांनी ते स्वतः काय करत आहेत, याची काहीएक माहिती दिली नाही.
मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक लाईव्ह प्रक्षेपित केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
केंद्राकडून बैठक लाईव्ह करावी किंवा नाही याबाबत कोणतीच सूचना नव्हती. ही बैठक लाईव्ह करू नये, याबाबत लेखी किंवा तोंडी कोणतीच सूचना देण्यात आली नव्हती. यामुळे काही समस्या निर्माण झाली असेल तर आम्ही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कोरोना संकटादरम्यान केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ऑक्सिजन आणि बेडची कमतरता हा प्रमुख मुद्दा आहे.
केंद्र सरकार दिल्लीच्या वाट्याचा ऑक्सिजन पुरवठा करत नाही, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर केंद्राकडून कोटा जारी करण्यात आला होता.
पण अनेक ठिकाणी ऑक्सिजन टँकर येऊ दिले जात नसल्याचं दिल्ली सरकारने म्हटलं आहे.
दिल्लीच्या अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








