You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोव्हिड 19च्या वयस्कर रुग्णांवरील उपचारांसाठी एम्स आणि ICMRच्या नवीन गाईडलाईन्स
एम्स, ICMR, कोव्हिड 19 टास्क फोर्स आणि जॉइंट मॉनिटरिंग ग्रूपने कोव्हिड 19च्या वयस्कर रुग्णांवरच्या उपचारांसाठीची नवीन कार्यपद्धती जाहीर केली आहे.
या रुग्णांचं वर्गीकरण माईल्ड (सौम्य), मॉडरेट (मध्यम) आणि सिव्हियर (गंभीर) अशा प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे आणि या रुग्णांवर कसे उपचार करावेत याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एम्स आणि ICMRच्या नवीन गाईडलाईन्स
- कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या ज्या वयस्कर रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत नसेल, त्यांना सौम्य संसर्ग प्रकारात धरलं जाईल.
- ज्या ज्येष्ठ रुग्णांच्या शरीरातली ऑक्सिजन पातळी खोलीमध्ये असताना 90 ते 93 टक्क्यांच्या मध्ये असेल त्यांना मॉडरेट म्हणजे मध्यम संसर्ग श्रेणीत धरण्यात येईल.
- ज्या रुग्णांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी खोलीत असताना 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना गंभीर संसर्ग असल्याचं मानलं जाईल.
- सौम्य संसर्ग असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आलंय.
- मॉडरेट म्हणजे मध्यम संसर्ग असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या वॉर्डमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आलंय. या रुग्णाची तब्येत गंभीर झाल्यास छातीचा सीटी स्कॅन आणि एक्स-रे काढण्याचा सल्ला देण्यात आलाय.
- गंभीर संसर्ग असणाऱ्या रुग्णांना ICU मध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना रेस्पिरेटरी सपोर्ट देण्यात यावा असं सांगण्यात आलंय.
- मॉडरेट आणि सिव्हियर प्रकारांतल्या रुग्णांना त्यांची तब्येत सुधारल्यानंतर डिस्चार्जसाठीच्या निकषांनुसार त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात यावं, असं सांगण्यात आलंय.
- 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोक, हृदयाशी संबंधित आजार, हायपरटेन्शन, मधुमेह, मूत्राशय, फुफ्फुसं किंवा यकृताचे विकार असणाऱ्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग गंभीर रूपात होण्याचा धोका जास्त असतो. अशा रुग्णांमधला मृत्यूदरही अधिक आढळला आहे.
- रेमडेसिवीरचा वापर ऑक्सिजन सपोर्टची गरज नसलेल्या, फक्त मध्यम आणि गंभीर श्रेणीतल्या रुग्णांसाठी करण्यात यावा, असं या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलंय.
- होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या आणि ऑक्सिजनची गरज न भासणाऱ्या रेमडेसिवीर देण्यात येऊ नये, असं सांगण्यात आलंय.
- ICU मध्ये दाखल होऊन 24 ते 48 तास उलटलेल्या गंभीर रुग्णांना आणि ज्यांची परिस्थिती बिघडत चाललीय अशांना टॉसिलिझुमॅब देण्याचा सल्ला देण्यात आलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)