You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : 24 तासात 1,03,558 कोरोनाग्रस्तांची नोंद, 478 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
गेल्या 24 तासांमध्ये (4 एप्रिल) कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संथ्या 1 लाख 3 हजार 558 इतकी झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू लागल्यावर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे 478 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. याबरोबरच देशातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,25,89,067 झाली आहे तर देशातील एकूण मृत्यूसंख्या 1,65,101 इतकी झाली आहे.
भारतात आतापर्यंत 7 कोटी 91 लाख 05 हजार 163 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू, मुंबईत आठनंतर मॉल्स बंद
राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.
27 मार्च (रात्री 12वाजल्यापासून), रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास, 1 हजार रुपये दंड बजावण्यात येणार आहे.
सर्व सार्वजनिक ठिकाणं 27 मार्चपासून रात्री आठ ते सकाळी सात बंद असतील.
मास्कविना आढळणाऱ्या व्यक्तीला 500रुपये दंड ठोठावण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला 1,000 रुपये दंड करण्यात येणार आहे.
गार्डन आणि चौपाट्या या पब्लिक जागा रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहतील. सिनेमा गृह, मॉल आणि हॉटेलं रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहणार मात्र होम डिलिव्हरी मात्र सुरू राहतील.
लग्न समारंभाला 50पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंत्यविधीला 20पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही.
विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक प्रशासनाला ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. क्वारंटीन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर तसं फलकाद्वारे सूचित करणं आवश्यक करण्यात आलं आहे. घरात क्वारंटीन व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात येणार आहे.
15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)