You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : औरंगाबादमध्ये लॉकडाऊन नाही, 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत निर्बंध
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यभरात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
येत्या 11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान औरंगाबादमध्ये नागरिकांच्या फिरण्यावर कठोर निर्बंध लावण्यात येतील, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त डॉ. आस्तिककुमार पांडे यांनी दिली.
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांचा विचार केल्यास शनिवारी (6 मार्च) 459 कोरोना रुग्ण शहरात आढळून आले, तर रविवारी (7 मार्च) हा आकडा 469 वर गेला.
त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादमधील निर्बंधांबाबत ठळक मुद्दे -
- औरंगाबादेत लॉकडाऊन नाही पण निर्बंध असणार.
- राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, आंदोलन बंद , स्विमिंग बंद, शाळा महाविद्यालय बंद.
- या कालावधीत लग्न-समारंभ होणार नाहीत.
- लग्न पूर्वीच ठरलेल्यांनी शक्यतो रजिस्टर लग्न करण्याचा प्रशासनाचा सल्ला.
- हॉटेल बार रात्री 9 नंतर बंद, 9 पर्यंतही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
- शनिवारी आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असेल.
- वैद्यकीय सेवा, फळ, गॅस उद्योग, कारखाने सुरू राहतील
- किराणा सुरू राहणार, मॉल बंद.
- बुधवारपासून बाजार समिती बंद.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)