You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: कसे आहेत आठ संघ?
इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी आठही संघ सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच चौदाव्या हंगामासाठी लिलाव झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिससाठी सर्वाधिक बोली लागली. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 16.25 कोटी रुपये मोजले. आतापर्यंतच्या आयपीएल लिलावात एका खेळाडूसाठी लागलेली ही सर्वाधिक बोली ठरली.
गेल्या हंगामातील खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेला ग्लेन मॅक्सवेल लिलावात मात्र यशस्वी ठरला. बेंगळुरूने 14 कोटी 25 लाख रुपये मोजून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अलीला चेन्नईने संघात समाविष्ट केलं. पंजाबने झाय रिचर्डसन आणि रिले मेरडिथ या ऑस्ट्रेलियन जोडगोळीसाठी मोठ्या प्रमाणावर तिजोरी खर्च केली.
राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असणार आहे. चौदाव्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलला होणार असून, 30मे रोजी फायनल रंगेल.
लिलावानंतर संघांची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया.
1.सनरायझर्स हैदराबाद
संघात कायम-डेव्हिड वॉर्नर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, जेसन होल्डर, शाहबाझ नदीम, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, विजय शंकर, विराट सिंग, बसिल थंपी, रशीद खान, टी.नटराजन, खलील अहमद.
नवीन- केदार जाधव, जगदीश सुचिथ, मुजीब उर रहमान.
2. किंग्ज इलेव्हन पंजाब
संघात कायम- के.एल. राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नालकांडे, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार.
नवीन- झाय रिचर्डसन, रिल मेरडिथ, शाहरुख खान, मॉइझेस हेन्रिके, डेव्हिड मलान, फॅबिअन अॅलन, जलाज सक्सेना, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग
3. मुंबई इंडियन्स
संघात कायम - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान
नवीन- नॅथन कोल्टिअर नील, अॅडम मिलने, पीयुष चावला, जेम्स नीशाम, युधवीर चरक, अर्जुन तेंडुलकर, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडुलकर
4. कोलकाता नाईट रायडर्स
संघात कायम-आयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरिन, राहुल त्रिपाठी , पॅट कमिन्स, , वरुण चक्रवर्ती, टीम सैफर्ट
नवीन- शकीबर अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, शेल्डॉन जॅक्सन, वेंकटेश अय्यर, वैभव अरोरा.
5. दिल्ली कॅपिटल्स
संघात कायम- श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, मार्कस स्टॉइनस, प्रवीण दुबे, शिमोरन हेटमायर, अँनरिक नॉर्किया, ललित यादव
नवीन- टॉम करन, स्टीव्हन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, ल्युकमन मेरिवाला, एम.सिद्धार्थ.
6. चेन्नई सुपर किंग्स
संघात कायम- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, , लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, , शार्दूल ठाकूर, सॅम करन, जोश हेझलवूड
नवीन-के.गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के.भगत वर्मा, सी.हरिथ निसांथ, एम.हरिसंकर रेड्डी.
7. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
संघात कायम एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अॅडम झंपा, केन रिचर्डसन, शाहबाझ अहमद, जोश फिलीप, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स.
नवीन- ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभूदेसाई, के.एस.भरत
8. राजस्थान रॉयल्स
संघात कायम- संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत,अँड्यू टाय.
नवीन- ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुस्ताफिझूर रहमान, लायम लिव्हिंगस्टोन, आकाश सिंग, के.सी.करिअप्पा, कुलदीप यादव.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)