संजय राठोड प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं असून सत्ताधारी पक्षांचे मंत्री आणि नेते हेच महिला अत्याचारामध्ये आघाडीवर आहेत.

मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप, फोटो हे सगळे उपलब्ध असताना साधा FIR ही दाखल होऊ नये, हे चुकीचं आहे, महाराष्ट्र पोलिसांची इतकी लाचार अवस्था आधी कधीच पाहिली नव्हती.

सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा दिली का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्याचं तथाकथित अधिवेशन उद्या सुरू होतय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातलं सर्वांत लहान अधिवेशन होतय. कामकाजामधून पळ काढण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

तीन पाटांचे सरकार

  • हे तीन पाटाचं सरकार आहे. कोण कोणत्या पाटावर बसलंय कोण कोणाचा पाट ओढतय हे कळतय.
  • मोठ्या प्रमाणावर बदल्या होतायतेय. बदल्यांसाठी बोल्या लागतायेत. आयएएस आणि आयपीएसच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतोय.
  • अतिवृष्टी, बोंडअळी, वीज बील कशातच सरकारने मदत केली नाही.
  • लोकांमध्ये वीजबिलांमुळे असंतोष आहे. वीज बीलासाठी 75 लाख लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. ही सक्त वसुलीची मोगलाई हे सरकार लागू करतय.
  • अवैध वाळूची चोरी, पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय.

महिलांवरील अत्याचारात वाढ

  • महिलांवर अत्याचार वाढले आहेत यात बोलायची काय सोय? सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्रीच यामध्ये आघाडीवर आहे. संजय राठोड यांच्या इतक्या क्लिप समोर येऊन गुन्हा दाखल झाला नाही. महाराष्ट्र पोलिसांची इतकी लाचार अवस्था आतापर्यंत पाहिली नव्हती.
  • पुण्याचे पीआय यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. इतके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही.
  • शक्ती कायदा हा एक फार्स आहे. जर मंत्री राठोड राजीनामा देत नसतील तर या कायद्याच्या समितीत असलेले आम्ही भाजप सर्व सदस्य राजीनामे देतोय. आम्हाला या समितीत राहायचं नाही
  • सावरकरांना आज अभिवादनही केलं नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देतो, की सत्ता येते आणि जाते. पण कोण किती लाचारी पत्करतो हे इतिहास विसरत नाही.

कोव्हिड परिस्थितीत भ्रष्टाचाराचा आरोप

  • कोव्हिड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत.
  • मराठा आरक्षणाच्या संदर्भात 8 तारखेपासून सुनावणी आहे. आज त्यासंदर्भात बैठक आहे. आम्हाला वर्षभरानंतर या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. आम्ही सरकारला हवी ती मदत करू. केंद्र सरकारकडून जर काही मदत लागणार असेल ती सुद्धा आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
  • मुख्यमंत्री नाराज आहेत तर तमाशा कसला आहे 18 दिवस? पोलीस कारवाई करत नाहीत. मंत्री राजीनामा देत नाहीत हे बिना आशीर्वाद कसं शक्य आहे?
  • चित्राताई लढवय्या आहेत त्यांना सरकारने कितीही त्रास दिला तरी त्या मागे हटणार नाहीत. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत.
  • काँग्रेस च्या रॅलीवेळी कोरोना नसतो, पोहरादेवी वेळी नसतो फक्त शिवजयंती आणि चहापानावेळी कोरोना असतो.
  • देशात ज्या ठिकाणी निवडणूका आहेत त्या त्या ठिकाणी निवडणूक होतेय. मग महाराष्ट्रात निवडणुका का होऊ शकत नाही? महाविकास आघाडीला या निवडणुका अडचणीच्या वाटतायेत म्हणून हे सरकार निवडणूक पुढे ढकलतंय.
ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)