पूजा चव्हाण : संजय राठोडांचा चौकशी आधीच राजीनामा झाल्यास त्याला भाजप जबाबदार - पोहरादेवी महंत

संजय राठोड, पूजा चव्हाण

फोटो स्रोत, facebook

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही, तर येत्या 1 मार्चपासून होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपने घेतली आहे.

दरम्यान, संजय राठोड हे आजच (28 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याच बैठकीत संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई तसंच पोहरादेवी येथील घडामोडींना सध्या वेग आला असून लवकरच याबाबत काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील द्वंद्वाचा आता कस लागणार आहे. हे प्रकरण घडून 20 दिवस झाले. आता त्यांना याबाबत भूमिका घ्यावी लागेल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय राजीनामा घेऊ नका - पोहरादेवी महंत

"पूजा चव्हाण प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये," अशी मागणी पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात व्हायरल झालेल्या 12 ऑडिओ क्लिपच्या आधारे संजय राठोड यांचा राजीनामा मागणं योग्य नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया जितेंद्र महाराज यांनी दिली.

ताज्या माहितीनुसार, "सध्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांची बैठक घेण्यात येत आहे. राठोडांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे."

संजय राठोड यांचा चौकशीआधीच राजीनामा घेऊ नका अशी मागणी महंत सुनील महाराजांनी केली होती.

"मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये. चौकशी न करता राजीनामा घेतला तर बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल, त्याला भाजप जबाबदार राहील. संजय राठोड यांना दोषी ठरवणं म्हणजे बंजारा समाजाला दोषी ठरवणं होईल, चौकशीतून येमारा निकाल सर्वांना मान्य राहील त्यामुळे चौकशी होईपर्यंत राजीनामा घेऊ नये अशी आमची विनंती आहे, "असं सुनील महाराज यांन म्हटलंय.

राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन नाही - चंद्रकांत पाटील

"वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही," असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या आत राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी (28 फेब्रुवारी) भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं.

संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण

एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्वीटने चर्चेत आणखीनच जास्त रंगत आणली.

सिंहासनाधिष्टित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचं पालन, असं ट्विट संजय राऊत यांनी आज (रविवार, 28 फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या ट्वीटचा अर्थ आता संजय राऊत यांच्या राजीनाम्याशी जोडण्यात येत असून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये आहे.

हा एक मीडिया मॅनेजमेंटचा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

यापूर्वीही, संजय राऊत यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत, पूजा चव्हाणच्या कुटुंबाला ते न्याय मिळवून देतील, असं संजय राऊत यांनी विधान संजय राऊत यांनी केले होते.

त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत म्हणूनच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना सध्या आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)