रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा?

रेशनसाठी रांग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

रेशन कार्डवर आपल्याला दर महिन्याला किती धान्य मिळायला हवं, त्याचा दर नेमका किती असावा, याची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकतो.

तुम्ही हा दर पाहून तुमच्या ओळखीच्या लोकांना मदतही करू शकता. त्यांचा वेळ वाचवू शकता आणि त्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेऊ शकता.

ते कसं त्याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

रेशन कार्डवरील रेकॉर्ड

रेशन कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवरील उजवीकडील ऑनलाईन सेवा या पर्यायाखालील ऑनलाईन रास्तभाव दुकानं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर AePDS-सर्व जिल्हे, हा पर्याय तिथं दिसेल. त्याच्यावर क्लिक केलं की, Aadhaar enabled Public Distribution System म्हणजेच AePDS नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

अन्न पुरवठा

फोटो स्रोत, mahaepos.gov.in/

या पेजवरील रिपोर्ट या पर्यायाखालील RC Details वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर RC Details नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं तुम्हाला महिना, वर्ष आणि SRC म्हणजेच 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केलं की रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

यात सुरुवातीला 'मेंबर डिटेल्स'मध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती दिलेली आहे.

यात जिल्हा, तालुका, FPS नंबर म्हणजे Fair price shop नंबर दिलेला असतो. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्य वितरित करण्यासाठी परवाना मिळालेल्या दुकानाचा हा नंबर असतो.

पुढे तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत रेशन मिळतं तिचं नाव दिलेलं असतं. दारिद्रय रेषेखालील, प्राधान्य गट, अंत्योगट गट असं वर्गीकरण तिथं नमूद केलेलं असतं.

रेशन

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावं, त्यांचं लिंग, वय, आधार कार्डचं प्रमाणीकरण झालं की नाही, ते सांगितलेलं असतं.

त्यानंतर Entitlement for RC या रकान्यात हे कुटुंब रेशन कार्डअंतर्गत किती धान्य मिळवण्यासाठी पात्र आहे, ते सांगितलेलं असतं.

Authentications for RC in February'2021 या रकान्यासमोर फेब्रुवारी महिन्यात कुटुंबातल्या कोणत्या सदस्यानं रेशनचं धान्य खरेदी केलं, याची माहिती असते.

आता रेशन कुणी खरेदी केलं ते आपण पाहिलं, पण किती धान्य मिळालं ते कसं पाहायचं. तर त्याची माहिती खालच्या Transaction Details for RC या रकान्यात दिलेली असते.

रेशन

फोटो स्रोत, Getty Images

धान्याचा दर कसा पाहायचा?

आता तुमचं कुटुंब ज्या प्रवर्गात मोडतं किंवा तुमच्याकडे ज्या प्रकारचं रेशन कार्ड आहे, त्या अंतर्गत तुम्हाला किती रुपये दरानं धान्य मिळतं, ते पाहूया.

यासाठी तुम्हाला mahaepos.gov.in असं सर्च करायचं आहे. या वेबसाईटच्या होमपेजवर उजवीकडील Policy & Price या पर्यायासमोर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला कोणतं धान्य किती रुपये दरानं मिळणार, याची सविस्तर माहिती तिथं दिलेली असते.

AAY (अंत्योदय), APL (दारिद्र्य रेषेवरील), NPH (प्राधान्यगटात नसलेली कुटुंब) PPH (प्राधान्यगटातील कुटुंब) या प्रकारानुसार धान्याचा दर इथं नमूद केला असतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)