नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसची नवी टीम जाहीर केली आहे.

यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.

याशिवाय दहा जणांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याच आलीय.

नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारीला आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "पक्षश्रेष्ठींनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि तो मी आनंदानं दिला आहे. आता जी काही जबाबदारी मला मिळेल तिला चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास नेणं हे माझं काम आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)