You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्थसंकल्पात काय असेल? कोरोनामुळे नव्या योजनांची घोषणा होईल?
- Author, निखील इनामदार
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मुंबई
भारताचा GDP आकुंचन पावत असण्याच्या ऐतिहासिक काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थव्यवस्था या वर्षी आठ टक्क्यांनी आकुंचन पावेल, मात्र 2021 मध्ये ती पुन्हा 11 टक्क्यांपर्यंतचा वृद्धीदर गाठेल, असा अंदाज आहे. मात्र या वाढीचा तुलनात्मक आकडाही बराच कमी होता.
गेल्या 100 वर्षात कधी झाला नसेल, असा अर्थसंकल्प यावर्षी सादर केला जाईल, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेत. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या आरोग्य संकटामुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प असेल, असे संकेत त्यांनी दिलेत. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत.
मात्र, भारताची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, ज्या क्षेत्रात खर्च वाढला आहे, त्याकडे सतर्कतेने लक्ष द्यावं लागणार आहे.
कुठल्या क्षेत्रांवर अधिक भर दिला जाईल?
चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पातील अंदाजे फरक 3.4 टक्क्याहून वाढून 7 टक्के होईल.
खासगी गुंतवणुकीची आजची स्थिती पाहता, आरोग्य सेवा, पायाभूत सुवधा यांसारख्या क्षेत्रात आर्थिक कृतींना प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे. तसंच, असंघटित क्षेत्रांना सुद्धा दिलासा देण्याची गरज आहे.
बँकांना पुनर्भांडवलासाठी किती तरतूद केली जाते, याकडेही लक्ष असेल. कारण या वर्षाच्या तुलनेत त्यांचा ताळेबंद कमकुवत झाला असणार आणि नवीन कर्ज देण्यासाठी त्यांना नवीन निधीची आवश्यकता असेल. तसंही बॅड बँकबद्दलही चर्चा झालीय. NPA (नॉन परफॉर्मिंग असेट्स) 14 टक्क्यांपर्यंत गेलंय.
कोरोनामुळे आलेल्या आरोग्य संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक नुकसानीला भरून काढण्यासाठी किंवा कोरोनाशी संबंधित खर्चासाठी श्रीमंतावर कुठला कर लादला जातोय का, हेही पाहिले जाईल.
शहरी रोजगार हमीसाठीच्या योजना, मनरेगासाठीची वाढीव तरतूद यांबाबत काही घोषणा होतायेत, याकडेही नजरा असतील.
कोरोनाची लस तयार करण्यासाठीही अर्थसंकल्पातून काही तरतूद केली जाईल का? जर अशी घोषणा झाली, तर ती खूप मोठी असेल. अर्थात, हे अशक्यच दिसतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)