मुंबई-पुण्याचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी नवीन मार्ग बनवणार - नितीन गडकरी

फोटो स्रोत, Nitin Gadkari/facebook
मुंबई-पुण्याची ट्रॅफिक कमी करण्यासाठी नवीन मार्ग बनवला जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय परिहवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातल्या रस्त्यांची कामं पाहण्यासाठी नितीन गडकरी आले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यांनी मांडलेले मुद्दे -
- महाराष्ट्रात 523 प्रोजेक्ट सुरू आहेत. काही प्रोजेक्टमध्ये अडचणी होत्या त्यावर बोलणं झालं. 5500 कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहेत.
- 3771 किलोमीटरचे कॉंक्रीट रोड महाराष्ट्रात बांधण्यात आले आहेत.
- पंढरपूर ते आळंदी आणि पंढरपूर ते देहू पर्यंतचे 12 हजार कोटी रूपयांचा पालखी मार्ग प्रस्तावित आहे.
- मुंबई पुण्याचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी नवीन मार्ग बनवला जाणार आहे. सूरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर मार्गे सोलापूर हैद्राबाद चेन्नईकडे जातो.
- दिल्ली मुंबई हायवेचं जमीन हस्तांतरण जवळपास पूर्ण झाले आहे.
- एक वर्षाच्या आत मुंबई गोवा हा 4 पदरी मार्ग तयार होईल.
- फास्टटॅग 75 % झालेलं आहे. लवकरात लवकर राहीलेल्या लोकांनी करून घ्यावं. 15 तारखेपर्यंत मुदत वाढवलेली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




