सुरेश रैना मुंबईतील नाईट पार्टीत का पकडला गेला?

फोटो स्रोत, EPA/JAIPAL SINGH
टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर सुरैश रैना आणि काही बॉलीवुड सेलिब्रिटींवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोरोनाचे नियम डावलून नाईट पार्टी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मंगळवारी बॉलीवूड सेलिब्रिटींची नाईट पार्टी अंधेरीतील क्लबमध्ये सुरू होती. पहाटे तीन वाजता मुंबई पोलिसांनी या पार्टीवर छापा मारला. पार्टीत उपस्थित असलेले क्रिकेटर आणि बॉलीवुड कलाकारांसह 34 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
यात सुरेश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुजैन खान यांची नावं समोर आली आहेत. ज्या क्लबवर छापा पडला तो बादशाहचा असल्याचं कळतंय.
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीत उपस्थित असलेले 19 जण दिल्ली आणि पंजाबमधून आले होते. या क्लबमध्ये सुरू असलेल्या नाईट पार्टीत काही नामांकित व्यक्तींचाही समावेश होता.
घडलेल्या प्रकाराबद्दल क्रिकेटर सुरेश रैनाने खेद व्यक्त केला आहे.
"सुरेश रैना मुंबईत शूटसाठी उपस्थित होता. एका मित्राने त्याला रात्री जेवायला येण्यासाठी विनंती केली. त्याला कोरोनाचे स्थानिक प्रोटोकॉल माहीत नव्हते. याबद्दलची माहिती दिल्यानंतर, त्याने तात्काळ नियम पाळले. घडलेल्या घटनेबद्दल त्याने खेद व्यक्त केला आहे," असं सुरेश रैनाच्या टीम कडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईत रात्री उशीरापर्यंत पार्टी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.
नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी पाहाता राज्य सरकारने 22 डिसेंबरपासून मुंबई आणि राज्यातील इतर महापालिका क्षेत्रात रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








