गूगल: जीमेल, युट्यूब, गुगल डॉक्स या गुगलच्या सेवा पुन्हा सुरू

गुगलच्या इमेल म्हणजे जीमेल आणि युट्यूब या दोन सेवा अचानक बंद पडल्याचा अनुभव नेटयुजर्सना आला. सोमवारी दुपारी दोन्ही सेवा वापरता येत नसल्याचं दिसून आलं होतं.

आता सेवा पुन्हा सुरू झाली आहे. गुगलचे जीमेल, डॉक्स आणि युट्युब या सेवा काही काळासाठी बंद पडल्या होत्या.

भारतातचं नव्हे तर जगभरातील युजर्सला हा अनुभव आला. गुगल सर्च इंजिन मात्र व्यवस्थितपणे काम करत होते.

तसेच गूगल डॉकही वापरता येत नसल्याचं दिसून आलं.

ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे पुन्हा प्रयत्न करा असा मेसेज जीमेल वापरताना येत होता.

सुमारे अर्ध्या तासानंतर गूगलच्या सेवा सुरू झाल्या. ही समस्या फक्त भारतापुरतीच नाही तर जगभरात अनेक देशांमध्ये दिसून आली. अर्थात सर्च इंजिन गुगलवर त्याचा प्रभाव दिसलेला नाही. ते नेहमीप्रमाणे सुरू आहे.

यूट्यूबवर पेज ओपन न होण्याचं कोणतंही कारण देण्यात आलं नव्हतं. एका अडथळ्यामुळे असं होत असल्याचं त्यात म्हटलं गेलं होतं आणि थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा असेही सांगितले गेले होते.

जीमेलद्वारे आलेल्या एका स्पष्टीकरणात म्हटलं होतं, "जीमेलबाबत येत असलेली समस्या आम्हाला माहिती आहे. त्यामुळे अनेक लोकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यांना जीमेल वापरता येत नाहीये." या समस्येमागचं कारण अद्याप समजलेलं नाही.

बीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी रॉरी केलन जोनस यांचं विश्लेषण

गुगल काही काळापुरतं बंद राहिलं. अवघ्या तासाभरात त्यांची सेवा पुन्हा सुरू झाली. पण, यामुळे ही गोष्ट लक्षात आली की, गुगलच्या सेवेवर जगभरातील कोट्यवधी लोक अवलंबून आहेत.

या तासाभरात ज्याने कुणी गुगल डाक्यूमेंट उघडण्याचा किंवा मेलला रिप्लाय करायचा प्रयत्न केला, त्यांना एक मेसेज आला आणि त्यामुळे त्यांच्या मनात घबराट निर्माण झाली.

"कृपया हे पेज पुन्हा लोड करण्याचा प्रयत्न करा किंवा काही मिनिटांत तुमच्याकडे परत येऊ. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो," असा हा मेसेज होता.

खरं तर घरी राहून चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी गुगल क्लाऊडसारखं व्यासपीठ किती मौल्यवान आहे, हे कोरानाच्या साथीनं आपल्याला दाखवून दिलं आहे.

त्यामुळे आजच्या घटनेनं गुगल क्लाऊड वापरकर्त्यांना घाबरून सोडलं आहे. पण, नेमकं आज चुकलं काय हे जाणून घ्यायची त्यांना इच्छा असेल. तसंच भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची हमीही त्यांना लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)