आसिफ बसरा यांची आत्महत्या, बॉलिवुड हळहळले

असिफ

फोटो स्रोत, Ani

बॉलीवुड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातल्या धर्मशालामधल्या एका गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केल्याचं कळतंय.

ते धर्मशालामध्येच भाड्याच्या घरात रहायचे. मात्र, आत्महत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. कांगडाचे एसएसपी विमुक्त रंजन यांनी ही माहिती दिली आहे.

आसिफ बसरा यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई', 'परजानिया', 'ब्लॅक फ्रायडे', 'जब वुई मेट', 'हिचकी' यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.

अमेझॉन प्राईमवरच्या 'पाताललोक' या लोकप्रिय वेबसीरिजमध्येही त्यांनी भूमिका बजावली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या काय पो छे या चित्रपटातही त्यानी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दमदार अभिनयासाठी ते ओळखले जायचे. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीलाही धक्का बसला आहे.

बॉलीवुडच्या दृष्टीनेही 2020 हे वर्ष वाईट होतं. यावर्षी अनेक चांगले कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर, इरफान खान यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. तर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने साऱ्यांना धक्का बसला.

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी साजीद-वाजीद यांच्यातल्या वाजीद यांचंही याच वर्षी हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या जेमतेम 47 व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण बॉलीवुड हळहळलं होतं. तर त्यांच्या काही दिवसांपूर्वीच गीतकार योगेश यांनीही इहलोकीचा निरोप घेतला होता.

बॉलीवुडमधल्या अनेकांनी आसिफ बसरा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "आसिफ बसरा. हे खरं असूच शकत नाही. हे खूप खूप वेदनादायी आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हंसल मेहतांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत अभिनेते मनोज वाजपेयी लिहितात, "काय? हे खूप धक्कादायक आहे. लॉकडाऊनच्या आधीच आम्ही एकत्र शूटिंग केलं होतं. "

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अभिनेत्री दिव्या दत्ताने आसिफ बसरा यांच्यासोबत होस्टेज-2 या वेब सीरिजमध्येही त्यांच्यासोबत काम केलं होतं. बसरा यांच्या जाण्याने धक्का बसल्याचं त्या लिहितात. "आसिफ बसरा यांच्या अचानक जाण्याची बातमी खूपच धक्कादायक आहे. आम्ही होस्टेज-2 मध्ये एकत्र काम केलं आहे. ते किती आनंदी होते. आणि अभिनेते म्हणूनही ते उत्तम होते."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

इमरान हाशमीनेही आरआयपी आसिफ भाई असं ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

अभिनेता सुमित राघवननेही ट्वीट करत हे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीवर प्रतिक्रिया देताना ते लिहितात, "हे धक्कादायक आहे. हे काय सुरू आहे? एक उत्कृष्ट अभिनेता आणि प्रेमळ व्यक्ती."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया लिहितात, "बसरा यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. ते उत्कृष्ट अभिनेते आणि प्रसन्नचित्त व्यक्ती होते. त्यांनी हे का करावं? अत्यंत दुःखद. परझानिया, लम्हामध्ये त्यांच्यासोबत काम केलं आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाळी आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका. )