बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना 'नोटा'पेक्षाही कमी मतं

फोटो स्रोत, EPA
बिहार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. एवढंच नाही, तर शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना 'नोटा' पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. बिहारच्या जनतेने शिवसेनेला पूर्णत: नाकारलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शिवसेनेने 23 उमेदवारांना बिहार निवडणुकीत तिकीट दिलं होतं.

शिवसेनेच्या कामगिरीबद्दल विचारलं असता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटल, "तेजस्वी यादव यांना मदत व्हावी अशी आमची कामगिरी होती."
बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने निवडणूक लढवली होती.
शिवसेनेच्या या पराभवावर बोलताना ट्विटरवर काँग्रेस नेते संजय निरूपम म्हणाले, "शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील 22 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. त्यामुळे कांग्रेसला सल्ला देण्यापेक्षा त्यांनी आपलं तोंड बंद करावं."
2015 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची बिहारमध्ये मोठी वाताहत झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)