कंगना राणावत विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर का?

कंगणा राणावत

फोटो स्रोत, TWITTER @KANGANATEAM

फोटो कॅप्शन, कंगणा राणावत

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींविरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली.

मुंबईत राहणारे आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करणारे मुनव्वर अली यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात वांद्रे कोर्टात याचिका दाखल करत दोघींविरोधात पोलीस कारवाई करण्याची मागणी केली होती.

कंगना आणि तिची बहीण ट्वीटरवरून द्वेषपूर्ण ट्वीट करून बॉलीवुडमध्ये हिंदू-मुस्लीम अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. त्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीने केलेले काही ट्वीटही आणि व्हीडिओ त्यांनी कोर्टात सादर केले.

त्यानंतर कोर्टाने कलम 156(3) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले. कंगनावर दाखल झालेली ही पहिली एफआयआर नाही. यापूर्वी कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावून कोर्टाच्या आदेशानंतर तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर सध्या मनाली या आपल्या होम टाऊनमध्ये असणाऱ्या कंगनाने एक ट्वीट करत पोलिसांनी आपल्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं. आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने आपण उपवास करत असल्याचं सांगत तिने एफआयआरचीही माहिती दिली आणि यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आपल्या ट्वीटमध्ये ती लिहिते, "नवरात्रीचा उपवास कोण-कोण करतंय? मीही उपवास करतेय आणि आजच्या पूजेनंतरचे हे फोटो. दरम्यान, माझ्याविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पप्पू सेना माझ्यामागे वेडी झालीये. माझी एवढी आठवण काढू नका. मी लवकरच तिकडे येणार आहे."

याचिकेत काय म्हटलं आहे?

वांद्रे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने कंगना बॉलीवुडला सातत्याने बदनाम करत असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणतात, "कंगना राणावत आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून आणि टीव्ही मुलाखतींमधून बॉलीवुडमध्ये काम करणारे लोक वंशवादी, पक्षपाती, अंमली पदार्थांचे व्यसन असलेली, धार्मिक भेदाभेद करणारी असल्याचं चित्र रंगवत आहे. यामुळे लोकांच्या मनात बॉलीवुडची अत्यंत वाईट प्रतिमा तयार होतेय. इतकंच नाही तर यामुळे दोन धर्मांमधल्या व्यक्तींमध्ये आणि सामान्य जनतेच्या मनात धार्मिक तेढ निर्माण होत आहे."

हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्येही कंगना फूट पाडत असल्याचा अली यांचा आरोप आहे. पालघरमधील साधूंची जमावाने केलेली हत्या असो, बीएमसीला 'बाबर सेना' म्हणणं असो किंवा जमाती कोरोना विषाणूचा फैलाव करत आहेत, हे ट्वीट असो, कंगणा आपल्या प्रत्येक ट्वीटमध्ये धर्म आणत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

कंगना जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणतात.

कंगाने एक ट्वीट केलं होतं. त्यात ती म्हणाली होती, "त्यांना काही कळत नाही. इंडस्ट्रीच्या 100 वर्षांच्या काळात मराठ्यांच्या स्वाभिमानावर एकही चित्रपट तयार करण्यात आला नाही. मी माझं आयुष्य आणि करिअर मुस्लिमांचं वर्चस्व असलेल्या उद्योगात पणाला लावलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवले. महाराष्ट्रातल्या आजच्या कंत्राटदारांना विचारा त्यांनी काय केलं?"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हे ट्वीटही याचिकाकर्त्यांनी कोर्टात सादर केलं. ते पुढे लिहितात, "कंगनाच्या ट्वीट्सवरून इंडस्ट्रीतले मुस्लीम कलाकार हिंदू कलाकारांचा छळ करतात, असा समज होऊन सामान्य जनतेच्या मनात मुस्लिम कलाकारांविषयी द्वेष निर्माण होईल."

इतकंच नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारी संस्थांविरोधात ट्वीट करून कंगनाने केवळ त्यांची प्रतिमाच मलिन केलेली नाही तर कायद्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याविषयी लोकांमध्ये अप्रिती निर्माण होईल, असाही याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

याचिकेत ते म्हणतात, "कंगना राणावत यांनी मुंबई पाकव्याप्त काश्मीर म्हणणारं अत्यंत आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. इतकंच नाही तर मुंबईहून मनालीला परतल्यावर आपण अगदी योग्य बोलल्याचंही त्या म्हणाल्या. मात्र, मुंबईत महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. मुंबई जगातलं सर्वात सुरक्षित शहर आहे आणि म्हणूनच कंगनाचं ट्वीट दिशाभूल करणारं आणि खोटं आहे."

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बदनाम करून महाराष्ट्र सरकारविषयी असंतोष निर्माण करण्याच्या असूयेने हे ट्वीट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या याचिकेची दखल घेत वांद्रे कोर्टाने कंगना आणि तिची बहीण रंगोली हिच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातल्या तुमकूर कोर्टानेही कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याने हे आदेश देण्यात आले होते.

केंद्रात कृषी कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध झाला आणि कायद्यांविरोधात निदर्शनंही करण्यात आली होती. त्यावेळी कंगनाने एक ट्वीट करत ज्या लोकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधा (CAA) चुकीची माहिती पसरवून दंगली घडवून आणल्या आता तेच लोक कृषी विधेयकाविरोधात चुकीची माहिती पसरवून देशात दहशत पसरवत आहेत. ते दहशतवादी आहेत, असं म्हटलं होतं.

शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप करत कंगनाविरोधात कर्नाटकातल्या तुमकूरमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)