हाथरस प्रकरण : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की, अटक

फोटो स्रोत, Ani
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपांनंतर असंतोषाचं वातावरण आहे. या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हाथरस प्रकरणावरून सोनिया गांधी यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. दरम्यान त्यांना रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गुरुवारी (1 ऑक्टोबर) सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नोएडामार्गे हाथरसकडे रवाना झाले होते. ग्रेडर नोएडा येथे यमुना एक्सप्रेस वेवर पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यानंतर राहुल गांधी गाडीतून उतरून चालत पुढे निघाले.
दरम्यान, पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली. तसंच त्याठिकाणी लाठीमार झाल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राहुल गांधी यावेळी पोलिसांना म्हणाले, "मी एकटा जाणार आहे. शांततेत मी जाईन. कलम 144 नुसार गर्दी करू शकत नाही. सभा होऊ शकत नाही. त्यामुळे मी एकट्याने जाईन. मला कोणत्या कलमांनुसार अटक करण्यात येत आहे?"
उत्तर प्रदेशात एकामागून एक बलात्काराची प्रकरणं उघड होत असल्याचं दिसल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रियंका गांधी यांनी या घटनेनंतर ट्वीटरवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. एक घमेंडखोर सत्ता निष्पाप मुलींच्या मृतदेहावर आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत आहे. अन्याय रोखण्याऐवजी स्वतःच अन्याय करत आहे. महिलांना एक सुरक्षित समाज आणि प्रदेश मिळण्यासाठी, त्यांना स्वतंत्र होऊन प्रगती करता येईल अशी स्थिती येण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
तर उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राजस्थानमध्ये जाऊन तिथली परिस्थिती पाहावी असा सल्ला दिला आहे. काँग्रेसचं तिथं सरकार आहे. तिथं होणाऱ्या घटनांवर प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)