सुरेश अंगडी: रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अंगडी हे उत्तम कार्यकर्ता आणि कुशल संघटक होते असं मोदींनी म्हटलं आहे.

ते समर्पित खासदार आणि कार्यक्षम मंत्री होते. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

अंगडी हे 65 वर्षांचे होते. 11 सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती.

ते म्हणाले होते, "माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहेत. जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी."

अंगडी हे बेळगावचे खासदार होते. त्यांचा जन्म कर्नाटकात 1 जून 1955 रोजी झाला होता. 2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून ते सातत्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)