संजय राऊत: ज्यांचं घर काचेचं असतं ते इतरांच्या घरावर दगड मारत नाहीत

संजय राऊत, शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलं आहे. राज कुमार यांच्या डायलॉगचा त्यांनी संदर्भ दिला.

राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है...

"चिनाय सेठ....,

जिनके घर शीशेके बने होते है... वो दुसरो पे पत्थर नही फेका करते''

समझने वालोंको इशारा काफी है!!!

जय महाराष्ट्र!

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

असं राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'काचेचं घर असणाऱ्यांनी लोकांच्या घरावर दगड फेकू नयेत'

'आम्ही राजकुमारचे फॅन आहोत. लोकांना कळलं की कोणाला सांगायचंय.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत असा एक नियम आहे. हे किती वेळा सांगायचं. आज सांगितलं. हा इशारा कोणाला आहे ते कळेल. हमाम में सब नंगे होते है. कोणीही कोणाकडेही बोट दाखवू नये. राजकारण, समाजकारणात सगळे काचेच्या घरात राहतात. माझा कुणावरती असा रोख नाहीये. सकाळी राजकुमार यांचा सिनेमा पाहत होतो. मला राजकुमार आठवला. नेहमी त्यांचे सिनेमा पाहतो.

मुंबई पोलीस सक्षम

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी विचारलं असता ते म्हणाले, अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूच्या चौकशीसंदर्भात मी काही बोलू इच्छित नाही. तो पोलिसांचा प्रश्न आहे, मी बोलणं योग्य नाही.

पोलीस मुंबईचे सक्षम आहेत. स्कॉटलंड यार्डशी त्यांची तुलना केली जाते. पोलीस तपासावर मी मत व्यक्त करणं योग्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यावर बोलतील. मी बोलण्याची वेळ आलेली नाही.

संजय राऊत, शिवसेना
फोटो कॅप्शन, संजय राऊत

लोकांना राजकुमार आजही आवडतो. राजकुमारचा मी मोठा चाहता. हा प्रसिद्ध डायलॉग आहे. लोकांना त्यांची आठवण करून दिली. कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेऊ इच्छित नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने अर्थ काढता. ते योग्य नाही.

मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. जी व्यक्ती सरकारचा भाग नाही त्यांनी यावर बोलणं योग्य नाही.

'मंदिर निर्मितीचा पाया शिवसेनेने रचला'

उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्री यांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला. इतर तीन मंत्री कोरोनाग्रस्त आहेत. उत्तर प्रदेश भाजप प्रमुख यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिथे कमीत कमी लोकांनी जावं. रखडलेला भूमीपूजन सोहळा पार पडावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे जात आहेत हे महत्त्वाचं आहे.

मुख्यमंत्री तिथे केव्हाही जाऊ शकतात. निमंत्रणासाठी कोणी थांबलेलं नाही. उत्तर प्रदेशची परिस्थिती समजून घ्या. मुख्य पुजारी, सुरक्षारक्षक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उमा भारती तिथे जाणार आहेत पण कोरोनामुळे सहभागी होणार नाहीयेत.

संजय राऊत, शिवसेना

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP

फोटो कॅप्शन, अयोध्या

अयोध्या मंदिरासाठी आमचं योगदान राहिलं आहे. मंदिर निर्माणाचा पाया आम्ही रचला. बाबरी मशीद तुटली नसती तर आज मंदिर उभारता आलं नसतं. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने यांनी हे मान्य केलं आहे की शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली. मंदिर निर्माणाचा मार्ग आम्ही सुकर केला. मंदिर होतं आहे याचा आम्हाला आनंद आहे.

शिवसेनेने एक कोटी रुपयांचा निधी मंदिर उभारण्याच्या कामासाठी दिला होता. आता तिथे जाण्यासारखी परिस्थिती नाही. कमीत कमी व्हीआयपी लोकांची मूव्हमेंट व्हावी. आमचं योगदान इतिहासासमोर आहे. आमचं योगदान स्मरणात राहील.

शिवसेनेला विसरले असं मला वाटत नाही. हे लग्न नाही. मेडिकल इमर्जन्सी आहे. अडवाणी आंदोलनाचे कर्ते आहेत. त्यांचं वय लक्षात घेता त्यांनी तिथे जाणं त्रासदायक ठरू शकतं. अनेक नेते तिथे जाणार नाहीयेत.

बिहारमध्ये पाच वर्षात काम झालं नसेल तर त्यांना अशा मुद्यांची गरज लागू शकते. नितीश कुमारांनी काम केलं असेल. केलेल्या कामाच्या मुद्यावर त्यांनी मतं मागावीत.

हवेत तीर मारणाऱ्यांचं राजकारण मी मानत नाही. ये पब्लिक है सब जानती है. पब्लिक को सब मालूम है. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. हा महाराष्ट्र आहे, हे मुंबई पोलीस आहे असं राऊत म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)