कोरोना व्हायरस : सोनं महागलं, गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करावी का?

कोरोना, सोनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोनं
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

स्वस्तात सोनं विकणारी सरकारी गोल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond) आजपासून सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांना प्रतिग्राम 50 रुपये सुट देणारी ही योजना आहे. यामध्ये 4,852 रुपये प्रति ग्राम भावानं सोनं मिळणार आहे. 10 जुलैपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. गुंतवणूकदारांना या बाँडची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. 8 वर्षांसाठी असलेल्या या बाँडवर गुंतवणूकदाराला 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.

लाईन

जगभरात लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल होत असले तरी अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर यायला अजून बराच काळ लागणार आहे. उद्योगधंदेही अजून सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय, लघु, मध्यम उद्योजक यांचं घर आणि उद्योग चालवताना कंबरडं मोडलंय. एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना एका गोष्टीने ग्राहकांना मागच्या सहा महिन्यात तब्बल 23 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच आता उद्योजकांच्या मदतीलाही ते धावून आलं आहे. ते म्हणजे सोनं.

झळाळता धातू अशी ओळख असलेलं सोनं... कठीण समयी घराला हातभार लावणारं, आणि कठीण आर्थिक काळात अर्थव्यवस्थेला हातभार लावणारं साधन म्हणून पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सोन्याचं महत्त्व आहे. आणि आताही तशीच भूमिका सोनं पार पाडत आहे. भारतात आणि जगातही मागच्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे.

भारतात सोन्याचा दर दहा ग्रॅमला जवळजवळ 47 हजारांवर पोहोचलाय. तर जागतिक बाजारात स्पॉटचा दर प्रतीऔंस 1763 डॉलर इतका आहे. तसेच सध्याचा कल पाहिला तर याच आठवड्यात सोनं प्रतितोळा विक्रमी पन्नास हजारांपर्यंत पोहोचू शकेल.

आगामी वर्षातही सोन्याची ही झळाळी कायम राहून 2021 पर्यंत सोनं 82 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केला आहे. हा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज् नी व्यक्त केलेला आहे. अमेरिकन स्पॉट बाजारात त्यांना सोन्याचं लक्ष्य 3 हजार डॉलर (1 औंसासाठी) इतकं निर्धारित केलं आहे.

नकाशा

जगभरात आढळलेले रुग्ण

Group 4

संपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा

स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग

आकडे - अंतिम अपडेट ५ जुलै, २०२२, १:२९ म.उ. IST

यात महत्त्वाची गोष्ट ही की, भारतात गेल्यावर्षी सोन्याने गुंतवणुकदारांना 23.7 टक्क्यांचा परतावा दिलेला आहे. तसेच आता सुरुवातीच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात हा परतावा 20 टक्के आहे.

काही बँकांनी तुमच्याकडे असलेलं सोनं तारण ठेवून त्यावर कर्ज देणाऱ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे गरजवंत मध्यमवर्गीय आणि लघु तसंच मध्यम आकाराचे उद्योजकही बँकांकडून मदत मिळवू शकणार आहेत.

अशाप्रकारे एकप्रकारे सोनं सामान्य लोकांना मदत करत आहे, त्याचवेळी सोन्यामध्ये लोकांची वाढलेली गुंतवणूक अर्थव्यवस्थेसाठी मात्र दु:स्वप्नासारखी आहे. कारण, सोन्याच्या दरात झालेली वाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेतली अस्थिरता दाखवते. ही वाढ सुरू राहणार हा तज्ज्ञांचा अंदाज अर्थव्यवस्थेची आगामी काळातली घालमेल दर्शवते.

तेव्हा या लेखात सामान्य गुंतवणूकदारांसाठी सोन्याचं महत्त्व, सोन्याचे दर वर-खाली होणं आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे होणारे परिणाम इथे समजून घेऊया.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

सध्याच्या इतर अनेक प्रश्नांवर जे उत्तर आहे तेच सोन्याचं ही आहे - कोरोनाचा उद्रेक.

पहिला उद्रेक संपून जगभरात लॉकडाऊन शिथिल होत असतानाच चीनसह, जपान आणि कोरियात कोरोनाचा दुसरा उद्रेक सुरू झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. तर दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेत एकाच दिवसांत जवळ जवळ 35 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली.

टेक्सास राज्याने पहिल्यासारखा कडक लॉकडाऊन बसवण्याचा इशारा दिला. तर लॅटिन अमेरिकेतही कोरोनाचा कहर वाढला आहे. अशा परिस्थितीत जगभरातली अर्थव्यवस्था आणखी काही महिने किंबहुना वर्षं अशीच दोलायमान राहील असा अंदाज किंवा भीती आहे. अशा अस्थिर बाजारात सोन्यामधील गुंतवणूक जगभरात वाढली आहे.

कोरोना, सोनं
फोटो कॅप्शन, सोने खरेदी

''आताच्या घडीला सोन्याला मागणी आहे. सुरक्षित गुंतवणूक हा सोन्याचा लौकिक पहिल्यापासून होता. आता सोनं सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन झालं आहे. शेअर बाजार आणि बाँड्स परतावा देत नसताना सोनं मात्र 20 टक्क्यांचा परतावाही देतंय आणि वर या घडीला ते सुरक्षितही आहे. म्हणून सोन्यात गुंतवणुकीचा कल जगभरात वाढलेला दिसेल.''

आनंद राठी कमोडिटिजचे जिगर त्रिवेदी यांनी आताच्या घडीला सोन्याचं महत्त्व समजावून सांगितलं. गुंतवणुकीचं साधन म्हणून सोन्याचा उल्लेख त्यांनी 'सेफ हेवन' म्हणजे सगळ्यात सुरक्षित असा केला.

दुसरं म्हणजे कोरोना हे आरोग्यविषयक संकट आहे तसंच त्यामुळे अर्थविषयक संकटही जगभरात निर्माण झालं आहे. त्यामुळे लोकांच्या घरी आर्थिक चणचण निर्माण झाली. आणि ती मिटवण्यासाठी सगळ्याच सरकारांनी लोकांच्या हातात पैसा खेळता राहावा यासाठी काही उपाययोजना केल्या.

सविस्तर माहिती

आणखी आकडेवारी पाहण्यासाठी स्क्रोल करा

*1,00,000 लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण

अमेेरिका (USA) 10,12,833 308.6 8,70,30,788
ब्राझील 6,72,033 318.4 3,25,35,923
भारत 5,25,242 38.4 4,35,31,650
रशिया 3,73,595 258.8 1,81,73,480
मेक्सिको 3,25,793 255.4 60,93,835
पेरू 2,13,579 657.0 36,40,061
युनायटेड किंग्डम 1,77,890 266.2 2,22,32,377
इटली 1,68,604 279.6 1,88,05,756
इंडोनेशिया 1,56,758 57.9 60,95,351
फ्रान्स 1,46,406 218.3 3,05,84,880
इराण 1,41,404 170.5 72,40,564
जर्मनी 1,41,397 170.1 2,85,42,484
कोलंबिया 1,40,070 278.3 61,75,181
अंर्जेंटिना 1,29,109 287.3 93,94,326
पोलंड 1,16,435 306.6 60,16,526
युक्रेन 1,12,459 253.4 50,40,518
स्पेन 1,08,111 229.6 1,28,18,184
दक्षिण आफ्रिका 1,01,812 173.9 39,95,291
तुर्कस्तान 99,057 118.7 1,51,80,444
रोमेनिया 65,755 339.7 29,27,187
फिलिपीन्स 60,602 56.1 37,09,386
चिली 58,617 309.3 40,30,267
हंगेरी 46,647 477.5 19,28,125
व्हिएतनाम 43,088 44.7 1,07,49,324
कॅनडा 42,001 111.7 39,58,155
चेक प्रजासत्ताक 40,324 377.9 39,36,870
बल्गेरिया 37,260 534.1 11,74,216
मलेशिया 35,784 112.0 45,75,809
इक्वेडोर 35,745 205.7 9,13,798
बेल्जियम 31,952 278.2 42,65,296
जपान 31,328 24.8 94,05,007
थायलंड 30,736 44.1 45,34,017
पाकिस्तान 30,403 14.0 15,39,275
ग्रीस 30,327 283.0 37,29,199
बांगलादेश 29,174 17.9 19,80,974
ट्युनिशिया 28,691 245.3 10,52,180
इराक 25,247 64.2 23,59,755
इजिप्त 24,723 24.6 5,15,645
दक्षिण कोरिया 24,576 47.5 1,84,13,997
पोर्तुगाल 24,149 235.2 51,71,236
नेदरलँड 22,383 129.1 82,03,898
बोलिव्हिया 21,958 190.7 9,31,955
स्लोव्हाकिया 20,147 369.4 25,51,116
ऑस्ट्रिया 20,068 226.1 44,99,570
म्यानमार 19,434 36.0 6,13,659
स्वीडन 19,124 185.9 25,19,199
कझाकस्तान 19,018 102.7 13,96,584
पॅराग्वे 18,994 269.6 6,60,841
ग्वााटेमाला 18,616 112.1 9,21,146
जॉर्जिया 16,841 452.7 16,60,429
श्रीलंका 16,522 75.8 6,64,181
सर्बिया 16,132 232.3 20,33,180
मोरोक्को 16,120 44.2 12,26,246
क्रोएशिया 16,082 395.4 11,51,523
बोस्निया आणि हर्जेगोविना 15,807 478.9 3,79,041
चीन 14,633 1.0 21,44,566
जॉर्डन 14,068 139.3 17,00,526
स्वित्झर्लंड 13,833 161.3 37,59,730
नेपाळ 11,952 41.8 9,79,835
मोल्डोव्हा 11,567 435.2 5,20,321
इस्रायल 10,984 121.3 43,91,275
होंडुरास 10,906 111.9 4,27,718
लेबनॉन 10,469 152.7 11,16,798
ऑस्ट्रेलिया 10,085 39.8 82,91,399
अझरबैजान 9,717 96.9 7,93,388
उत्तर मॅसिडोनिया 9,327 447.7 3,14,501
सौदी अरेबिया 9,211 26.9 7,97,374
लिथुएनिया 9,175 329.2 11,62,184
अर्मेनिया 8,629 291.7 4,23,417
क्युबा 8,529 75.3 11,06,167
कोस्टा रिका 8,525 168.9 9,04,934
पनामा 8,373 197.2 9,25,254
अफगाणिस्तान 7,725 20.3 1,82,793
इथिओपिया 7,542 6.7 4,89,502
आयर्लंड 7,499 151.8 16,00,614
उरुग्वे 7,331 211.8 9,57,629
तैवान 7,025 29.5 38,93,643
बेलारूस 6,978 73.7 9,82,867
अल्जेरिया 6,875 16.0 2,66,173
स्लोवेनिया 6,655 318.7 10,41,426
डेन्मार्क 6,487 111.5 31,77,491
लिबिया 6,430 94.9 5,02,189
लॅटव्हिया 5,860 306.4 8,37,182
व्हेनेझुएला 5,735 20.1 5,27,074
पॅलेस्टाईन 5,662 120.8 6,62,490
केनिया 5,656 10.8 3,34,551
झिम्बाब्वे 5,558 38.0 2,55,726
सुदान 4,952 11.6 62,696
फिनलंड 4,875 88.3 11,45,610
ओमान 4,628 93.0 3,90,244
डॉमिनिकन प्रजासत्ताक 4,383 40.8 6,11,581
एल साल्वाडोर 4,150 64.3 1,69,646
नामिबिया 4,065 163.0 1,69,247
त्रिनिदाद आणि टोबॅगो 4,013 287.7 1,67,495
झाम्बिया 4,007 22.4 3,26,259
युगांडा 3,621 8.2 1,67,979
ॲल्बेनिया 3,502 122.7 2,82,690
नॉर्वे 3,337 62.4 14,48,679
सीरिया 3,150 18.5 55,934
नायजेरिया 3,144 1.6 2,57,637
जमैका 3,144 106.6 1,43,347
कोसोवो 3,140 175.0 2,29,841
कंबोडिया 3,056 18.5 1,36,296
किर्गिझस्तान 2,991 46.3 2,01,101
बोट्सवाना 2,750 119.4 3,22,769
मॉन्टेनिग्रो 2,729 438.6 2,41,190
मलावी 2,646 14.2 86,600
एस्टोनिया 2,591 195.3 5,80,114
कुवेत 2,555 60.7 6,44,451
संयुक्त अरब अमिराती 2,319 23.7 9,52,960
मोझाम्बिक 2,212 7.3 2,28,226
मंगोलिया 2,179 67.6 9,28,981
येमेन 2,149 7.4 11,832
सेनेगल 1,968 12.1 86,382
कॅमरून 1,931 7.5 1,20,068
अंगोला 1,900 6.0 1,01,320
उझबेकिस्तान 1,637 4.9 2,41,196
न्यूझीलंड 1,534 31.2 13,74,535
बहारीन 1,495 91.1 6,31,562
रवांडा 1,460 11.6 1,31,270
घाना 1,452 4.8 1,66,546
सिंगापूर 1,419 24.9 14,73,180
एस्वाटिनी 1,416 123.3 73,148
मादागास्कर 1,401 5.2 65,787
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 1,375 1.6 91,393
सुरीनाम 1,369 235.5 80,864
सोमालिया 1,361 8.8 26,803
गयाना 1,256 160.5 67,657
लक्झम्बर्ग 1,094 176.5 2,65,323
सायप्रस 1,075 89.7 5,15,596
मॉरिशस 1,004 79.3 2,31,036
मॉरिटानिया 984 21.7 60,368
मार्टिनिक 965 257.0 1,95,912
ग्वाडलूप 955 238.7 1,68,714
फिजी 866 97.3 65,889
टांझानिया 841 1.4 35,768
हैती 837 7.4 31,677
बहामा 820 210.5 36,101
रियुनियन 812 91.3 4,22,769
आयव्हरी कोस्ट 805 3.1 83,679
लाओस 757 10.6 2,10,313
माल्टा 748 148.8 1,05,407
माली 737 3.7 31,176
लेसोथो 699 32.9 33,938
बेलीझ 680 174.2 64,371
कतार 679 24.0 3,85,163
पापुआ न्यू गिनी 662 7.5 44,728
फ्रेंच पॉलिनेशिया 649 232.4 73,386
बार्बाडोस 477 166.2 84,919
गिनी 443 3.5 37,123
केप व्हर्ड 405 73.6 61,105
फ्रेंंच गिनी 401 137.9 86,911
बुर्किना फासो 387 1.9 21,044
रिपब्लिक ऑफ काँगो 385 7.2 24,128
सेंट लुसिया 383 209.5 27,094
गाम्बिया 365 15.5 12,002
न्यू कॅलिडोनिया 313 108.8 64,337
नायजर 310 1.3 9,031
मालदीव 306 57.6 1,82,720
गॅबॉन 305 14.0 47,939
लायबेरिया 294 6.0 7,497
क्युरसॉ 278 176.5 44,545
टोगो 275 3.4 37,482
निकाराग्वा 242 3.7 14,690
ग्रेनाडा 232 207.1 18,376
ब्रुनेई 225 51.9 1,67,669
अरूबा 222 208.8 41,000
चॅड 193 1.2 7,426
जबूती 189 19.4 15,690
मायट 187 70.3 37,958
इक्वेटोरियल गिनी 183 13.5 16,114
आईसलँड 179 49.5 1,95,259
चॅनल आयलंड्स 179 103.9 80,990
गिनी बिसॉ 171 8.9 8,369
सेशेल्स 167 171.1 44,847
बेनिन 163 1.4 27,216
कमोरोस 160 18.8 8,161
अँडोरा 153 198.3 44,177
सोलोमन बेटे 153 22.8 21,544
अँटिग्वा आणि बार्बुडा 141 145.2 8,665
बर्म्युडा 140 219.0 16,162
दक्षिण सुदान 138 1.2 17,722
तिमोर-लेस्ते 133 10.3 22,959
ताजिकिस्तान 125 1.3 17,786
सिएरा लिओन 125 1.6 7,704
सान मरीनो 115 339.6 18,236
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स 114 103.1 9,058
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 113 2.4 14,649
आईल ऑफ मॅन 108 127.7 36,463
जिब्रोल्टर 104 308.6 19,633
एरिट्रिया 103 2.9 9,805
सेंट मार्टिन 87 213.6 10,601
लिखटनस्टाईन 85 223.6 17,935
साओ टोम आणि प्रिन्सपी 74 34.4 6,064
डॉमिनिका 68 94.7 14,852
सेंट मार्टिन 63 165.8 10,952
ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स 63 209.8 6,941
मोनॅको 59 151.4 13,100
सेंट किट्स आणि नेव्हिस 43 81.4 6,157
बुरुंडी 38 0.3 42,731
बॉनेअर, सेंट युस्टेशियस आणि साबा 37 142.4 10,405
टर्क अँड केकॉस आयलंड्स 36 94.3 6,219
केयमेन आयलंड्स 29 44.7 27,594
समोआ 29 14.7 14,995
फॅरो आयलंड्स 28 57.5 34,658
भूतान 21 2.8 59,824
ग्रीनलँड 21 37.3 11,971
व्हानुआतू 14 4.7 11,389
किरबाती 13 11.1 3,236
डायमंड प्रिन्सेस जहाज 13 712
टोंगा 12 11.5 12,301
अँग्विला 9 60.5 3,476
मॉन्तसेरात 8 160.3 1,020
वॉलिस अँड फुटुना आयलंड 7 61.2 454
पलाऊ 6 33.3 5,237
सेंट बार्थेलेमी 6 60.9 4,697
एमएस झांडम जहाज 2 9
कुक आयलंड्स 1 5.7 5,774
सेंट पियर अँड मिकलन 1 17.2 2,779
फॉकलंड आयलंड्स 0 0.0 1,815
मायक्रोनेशिया 0 0.0 38
व्हॅटिकन 0 0.0 29
मार्शल बेटे 0 0.0 18
अंटार्क्टिका 0 11
सेंट हेलेना 0 0.0 4

संपूर्ण मजकूर व्यवस्थित पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा

ही माहिती सातत्याने अपडेट केली जात आहे. पण काही देशांची ताजी आकडेवारी उपलब्ध नसू शकते.

**नवीन रुग्णांचं प्रमाण हे तीन दिवसांची सरासरीमधून काढलं जातंय. काही ठिकाणी कोरोनाच्या केसेसची स्थिती बदलत असल्यामुळे या तारखेसाठी सरासरी काढणं शक्य नाही.

स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग

आकडे - अंतिम अपडेट ५ जुलै, २०२२, १:२९ म.उ. IST

''भारतातही कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. प्रॉव्हिडंड फंडाचा मी टक्का कमी करण्यात आला आहे. अशावेळी लोकांच्या हातात पैसा येतो. पण, त्याचबरोबर कर्जाचा हप्ता जसा कमी होतो तसा गुंतवणुकीवर मिळणारा म्हणजे मुदतठेवींवर मिळणारा व्याजदर कमी होतो. त्यामुळे हातात येणारा अतिरिक्त पैसा हा बँकेत कमी व्याजदराने ठेवण्यापेक्षा सोनं किंवा चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवण्याकडे लोकांचा कल वाढतो.

हातात पैसा खेळतो तेव्हा बाजारात महागाईही वाढते. आणि अशावेळी सोन्याचा दरही वाढतो आणि सोन्यात गुंतवणूकही वाढते असं नेहमीच पहायला मिळालं आहे.'' जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही हरिष यांनी हा मुद्दा स्पष्ट करून सांगितला.

सोन्यात नव्याने गुंतवणूक करावी का?

या प्रश्नाचा अर्थ हा की, आताच सोनं इतकं वाढलेलं असताना, नव्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार सामान्य गुंतवणूकदारांनी करावा का?

वर म्हटल्याप्रमाणे सोन्याचे दर इथून पुढेही वर्षभर वाढत जातील असाच तज्ज्ञांचा अंदाज आहे. शिवाय सगळे पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता ते विविध साधनांमध्ये कमी अधिक प्रमाणात गुंतवण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी देत असतात. आताही त्यांनी याच गोष्टीवर बोट ठेवलं आहे.

कोरोना, सोनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोनं

''सध्या जगभरातच सोन्याचे दर वाढत आहेत. आणि दुर्दैवाने कोरोनाची परिस्थितीही आणखी काही दिवस अशीच राहणार असल्याने सोनं हा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय असू शकतो.'' त्रिवेदी यांनी आपला मुद्दा मांडला.

''सोन्याचे दर वाढतायत म्हणून फक्त तेवढ्यापूरती गुंतवणूक न करता दरवर्षी नियमितपणे सोन्यात गुंतवणूक करणंही चांगलं. जसे शेअर बाजारात, बँकेच्या मुदतठेवीत आपण नियमित पैसे गुंतवतो. तशीच गुंतवणूक सोन्यातही हवी. त्यामुळे गुंतवणुकीत विविधता येऊन तुमची जोखीम कमी होते. शेअर बाजार पडले, मुदतठेवीवरचे दर कमी होतील. त्यावेळी सोन्यातली गुंतवणूक तुम्हाला मदत करेल. जशी आता करते आहे. पण, त्यासाठी सोनं धातू स्वरुपात विकत घेण्यापेक्षा लोकांनी गोल्ड ETF, बाँड यांसारखे पर्यायही बघितले पाहिजेत''

गोल्ड ETF आणि पेपर गोल्ड

आता गोल्ड ETF, बाँड हे इतर पर्याय बघू. सोन्यावर लोकांचा विश्वास आहे कारण, त्याच्या किमती शेअर बाजाराप्रमाणे सतत वर-खाली होत नाहीत. त्यात बऱ्यापैकी स्थिरता आहे. म्हणूनच त्यात जोखीम खूप कमी आहे. शिवाय अडल्या गरजेला सोनं विकून पैसे उभे करता येतात ही विश्वास आहे. पण, या व्यवहारांमध्ये सोनं अनेकदा घरी पडून राहतं. त्याचा अर्थव्यवस्थेसाठी पुरेसा वापर होत नाही. शिवाय ते विकत घेताना आणि विकतानाही सोनार आपला घसघशीत वाटा त्यात घेत असतो.

''उलट गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड हे असे पर्याय आहेत, जिथे सोनं खरेदी तुम्ही करता बाजारात जो दर आहे त्यादराने. बाकी कुठलंही शुल्क तुम्हाला द्यावं लागत नाही.

विकतानाही तुम्हाला सोनाराला वजावट द्यावी लागत नाही. सोन्याचा दर वरखाली होतो त्याप्रमाणे तुमचा परतावा तुम्हाला मिळू शकतो. यात धातूरुपी सोनं तिजोरीत जपून ठेवावं लागतं तशी जोखीमही नाही.'' गोल्ड ETFची सोय त्रिवेदी यांनी समजून सांगितली.

कोरोना, सोनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोन्याचे दागिने

EFT आणि म्युच्युअल फंडात तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूकही करू शकता. अगदी पाचशे रुपयांपासून. त्यामुळे एकरकमी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवहार ऑनलाईन करण्याची सोय आहे. आणि तुमच्याकडचे युनिट्स विकल्यावर कमाल तीन दिवसांत पैसे जमा होत असल्याने लवचिकताही राहते.

थोडक्यात धातुरुपी सोनं विकत घेण्यापेक्षा अशा नव्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सोनं आणि अर्थव्यवस्था

सामान्य नागरिक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीचा आपण विचार केला. पण, त्याचवेळी सोन्याचे असे वाढते दर आणि पुढच्या वर्षभरासाठी तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज देशाच्या आणि जगाच्या अर्थकारणाबद्दल नेमकं काय सांगतो?

कोरोना
लाईन

अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, इतर गुंतवणुकीच्या साधनांमध्ये जसं सरकारी रोखे, कर्जरोखे, बाँड्स, शेअर बाजार, म्युच्युअल फंड यांच्यामध्ये जसा पैसा खेळता राहतो तसा तो धातूरुपी सोन्याच्या खरेदी-विक्रीत राहत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे जागतिक अर्थव्यवस्थांचा कल हा इतर साधनांमध्ये जास्त असतो. पण, जगात युद्ध किंवा इतर काही कारणांमुळे अस्थिरता असेल तर नक्कीच आंतरराष्ट्रीय अर्थकारणातही गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन देशांचा सोन्याकडे कल वाढतो. म्हणूनच आता फक्त भारतातच नाही तर जगात सगळ्याच देशांत सोन्याचे दर चढे आहेत.

आपण घरामध्ये जसं अडल्या गरजेला सोनं विकून पैसा उभा करण्याची तयारी ठेवतो तोच उपयोग देशाच्या अर्थकारणात सोन्याचा आहे. त्यामुळे सोन्याचा हेजिंगसाठी वापर होतो.

अमेरिका आणि भारत हे दोन देश असे आहेत जिथे सरकारी तिजोरीत सोन्याचं प्रमाण जास्त आहे. सोन्याच्या दरातील स्थैर्यामुळे सोन्याला सरकारी तिजोरीत हे स्थान आहे. बाहेरच्या देशातून कुठलाही माल आयात करताना आपल्याकडच्या सोन्याचा उपयोग होतो.

मग आता सोन्याच्या वाढत्या दराचा देशाला फायदा होईल की तोटा?

भारतात सोन्याला मौल्यवान धातू म्हटलं जातं. सण-समारंभात आणि गुंतवणूक म्हणूनही सोन्याला महत्त्वाचं स्थान आहे. पण, अनेकदा सोनं हे घरात पडून राहतं. ते फिरतं राहत नाही. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होत नाही.

कोरोना, सोनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोनं

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजीत फडणीस यांनी त्याचा अर्थ समजावून सांगितला. ''आपल्याकडे सोन्याला महत्त्व आहे. पण, दुर्दैवाने सोनं आपल्याकडे बनत नाही. म्हणजे पुरेशा सोन्याच्या खाणी भारतात नाहीत. त्यामुळे गेली कित्येक वर्षं सोनं आपण आयात करत आहोत. आपल्या एकूण आयातीच्या किमान 12 टक्के वाटा हा फक्त सोन्याचा आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहारात हा पैसा आपल्याला डॉलर देऊन उभा करायचा असतो. म्हणजेच आपल्याकडचं परकीय चलन सोन्यावर खर्च होतं. पण, त्याचा उपयोग सोनं परिधान करण्यापेक्षा वेगळा होत नाही. ही गोष्ट थोडी देशाची चिंता वाढवणारी आहे.''

अगदी ताजे म्हणजे 2019-20चे आकडे उपलब्ध नाहीत. पण, त्याच्या आधीच्या वर्षी जगभरात 4,000 टन सोन्याचं उत्पादन झालं होतं. आणि त्यातलं 26 टक्के म्हणजे 1050 टनांच्या वर सोनं एकट्या भारताने आयात केलं.

''सोनं घरी बाळगून वैयक्तिक संपत्तीत वाढ होते. पण, देशाच्या संपत्तीत भर पडत नाही. म्हणूनच धातूरुपी सोन्यातली गुंतवणूक सामान्य गुंतवणुकदारांनी कमी करावी. आणि ETF तसंच गोल्ड बाँडचा पर्याय स्वीकारून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावावा.'' डॉ. फडणीस यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)