भारत-चीन सीमा वाद: गलवान खोऱ्यातील झटापटीबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या बातम्यांमागचे सत्य

भारत चीन सीमा वाद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात चीनविरोधात लोक आक्रमक
    • Author, रिअॅलिटी चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान झालेल्या चकमकीनंतर सोशल मीडिया यूझर्सकडून अनेक चुकीचे मेसेज आणि व्हीडिओ पसरवले जात आहेत.

या दोन देशांदरम्यान झालेल्या ताज्या चकमकीचा दावा करणारे फोटो आणि व्हीडिओ आम्हाला सोशल मीडियावर सापडले, पण तपासणीनंतर हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट झालं.

1. सैनिक लढाई करत असतानाचा व्हीडिओ

पहिला व्हीडिओ हा यूट्यूबवरचा आहे, ज्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या ताज्या चकमकीची 'खरी लढाई' दाखवली गेली आहे. गलवान खोऱ्यात ही चकमक झाल्याचं सांगितलं जात आहे.

हा व्हीडिओ 21 हजार जणांनी पाहिला आहे, तसंच ट्वीटरवर तो मोठ्या प्रमाणावर शेयर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ शेयर करत भारतीय सैन्यानं चीनला हुसकावून लावलं, असंही काही ट्वीटर यूझर म्हणत आहे.

भारत चीन सीमा वाद
फोटो कॅप्शन, हा व्हीडिओ तीन वर्षे जुना आहे

पण, खरं म्हणजे हा व्हीडिओ दुपारी भर उन्हात शूट करण्यात आला आहे, तर लडाखमध्ये नुकतीच झालेली चकमक ही रात्री घडली होती.

ऑगस्ट 2017 आणि सप्टेंबर 2019ला हाच व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचं आमच्या लक्षात आलं. भारतीय आणि चिनी सैन्यामधील चकमक असा दावा हा व्हीडिओ शेयर करताना करण्यात आला होता.

2. भारतीय जवान शोक व्यक्त करत आहेत?

भारतीय जवान रडत आहेत आणि एकमेकांना मिठ्या मारत आहेत. कारण इतर जण मृतदेहांची बॅग उचलत आहे, असा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेयर होत आहे.

काही यूझर्सनं याचा संबंध गलवान खोऱ्यातील चकमकीशी लावला आहे.

भारत चीन सीमा वाद

असं असलं तरी हा व्हीडिओ काश्मीर भागातला असून तो वर्षभरापूर्वीचा आहे. भारतीय सैन्य आणि सशस्त्र कट्टरवाद्यांमध्ये झालेल्या झडपीदरम्यानचा हा व्हीडिओ आहे.

या व्हीडिओचा सध्या भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या वादाशी काहीएक संबंध नाहीये.

3. दोन देशांच्या सैन्यामधील अधिकाऱ्यांचा संवाद

भारतीय जवान आणि चिनी जवान एकमेकांशी संवाद साधत असल्याचा व्हीडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे आणि त्याला हजारो जणांनी पाहिलं आहे.

या व्हीडिओत चीनचा जवान भारतीय जवानाला खडसावत आहे आणि निघून जायला सांगत आहे. चिनी भाषेच्या टिकटॉक या व्यासपीठावर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे आणि त्याला 33 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसंच काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यानेही हा व्हीडिओ शेयर केला आहे.

भारत चीन सीमा वाद

असं असलं तरी हाच व्हीडिओ मे महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याचा सध्याच्या चकमकीशी काही संबंध नसल्याचं दिसून येतं. तसंच या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हा व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड केल्याचं दिसून येतं.

त्याशिवाय हा व्हिडिओ लडाखच्या डोंगरावरील भागातील नसल्याचं चित्रण केलेल्या भूभागातून अगदी स्पष्ट आहे.

हा व्हीडिओ नेमका कुठे शूट केलाय, ती जागा आम्ही शोधू शकलो नसलो तरी, एका फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या मते, हा व्हीडिओ अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात शूट केल्याचं दिसून येतं.

4. भारतीय जवानाचे अंत्यसंस्कार

दुसऱ्या एका व्हीडिओत भारतीय जवानावर अंत्यसंस्कार सुरू असल्याचं दिसून येतं. यावेळी इतर भारतीय जवान घोषणा देत असल्याचंही दिसतं.

हा व्हीडिओ 40 हजार जणांनी पाहिला आहे. तसंच हा व्हीडिओ गलवान खोऱ्यातील आहे असं सांगून भारतीय जवानांची प्रशंसा केली जात आहे.

भारत चीन सीमा वाद

असं असलं तरी 16 जूनला मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय जवानांशी या व्हीडिओचा काहीएक संबंध नाहीये.

हाच व्हीडिओ मे महिन्यात यूट्यूबवर पोस्ट केल्याचं रिव्हर्स इमेजमधून स्पष्ट होतं.

हा व्हीडिओ ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की, इतर जवान ज्या जवानाचं नाव घेऊन घोषणा देत आहे, ते नाव तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर हा जवान मे महिन्यात लेह-लडाख परिसरात मे महिन्यात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडल्याचं लक्षात येतं. या जवानावर महाराष्ट्रातल्या त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

5. शेवपेट्यांचे फोटो

भारत आणि चीनदरम्यान झालेल्या चकमकीवरील चिनी भाषेतील लेखात जे फोटो वापरण्यात आले, त्यात भारतीय जवानांचे मृतदेह दाखवण्यात आले आहेत.

हा लेख 1 लाखहून अधिक वेळा वाचला गेला आहे. तसंच या लेखातील फोटो पाकिस्तानची न्यूज वेबसाईट Baaghitv वर वापरण्यात आला आहे.

भारत चीन सीमा वाद

तसंच सोशल मीडियावर क्रॉप करून हा फोटो पसरवला जात आहे.

पण, रिव्हर्स इमेजवरून दिसून येतं की, हा फोटो नायजेरियातील आहे. बोको हरामच्या कट्टरवाद्यांनी 2015मध्ये नायजेरियाच्या जवानांना ठार केलं होतं, तेव्हाचा हा फोटो आहे.

या लेखातील दुसऱ्या फोटोमध्ये जवानांच्या शवपेट्या पुष्पहारासहित दिसत आहेत, हा फोटो फेब्रुवारी 2019मध्येच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय सैन्यावर पुलवामा येथे हल्ला झाला होता. त्यामुळे सध्याच्या चकमकीशी या फोटोचाही काहीएक संबंध नाहीये.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)