भारत-चीन सीमा वादावर लक्ष ठेवून आहे, मध्यस्थीसही तयार - डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, NICHOLAS KAMM
भारत आणि चीनदरम्यानच्या वादावर आपण लक्ष ठेवून आहोत, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, या प्रकरणात मदत करण्याची इच्छाही ट्रंप यांनी व्यक्त केलीय.
ट्रंप यांनी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, "ही खूपच अवघड परिस्थिती आहे. आम्ही भारताशी चर्चा करत आहोत. तसंच चीनशीही बोलत आहोत. तिथं दोघांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता पुढे काय होतंय, ते आम्ही पाहू. या दोन्ही देशांची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
15-16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला.
चीनचेही अनेक जवान जखमी असल्याचं वृत्त आहे, पण चीननं याविषयी अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.
भारत आणि चीनमधील तणावाची परिस्थिती पाहून गेल्या महिन्यात ट्रंप यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, ते भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मध्यस्थी करायला तयार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एका ट्वीटमध्ये ट्रंप यांनी म्हटलं होतं, "आम्ही भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांना सांगितलं आहे ती त्यांच्यातील सीमा वादात अमेरिका मध्यस्थी करायला तयार आहे."
असं असलं तरी ट्रंप यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला भारत आणि चीन या दोन्ही देशांनी नकार दिला होता.
चीनबरोबरच्या तणावाच्या संबंधांमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूड खराब आहे, असंही ट्रंप यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून भारताप्रती संवेदना व्यक्त
भारत आणि चीनदरम्यानच्या परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी ट्वीट करत म्हटलं की, "चीनबरोबर झालेल्या चकमकीत भारताच्या जवानांना प्राण गमवावे लागेल, त्यामुळे भारताच्या लोकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसंच या जवानांच्या कुटुंबीयांप्रतीही संवेदना व्यक्त करतो."

फोटो स्रोत, AFP
एकीकडे भारत आणि चीन या दोन्ही देशात तणावाचं वातावरण असताना, दुसरीकडे अमेरिका चीनसोबत ताणल्या गेलेल्या संबंधांना शांत करण्याचाही प्रयत्न करतेय.
बुधवारीच हवाईमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी यांग जिची यांच्यासोबत तब्बल सात तास बैठक घेतली. दोघेही डिनरला भेटले आणि सात तास दोन्ही देशांसंबधी चर्चा केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
निरीक्षकांचं म्हणणं आहे की, सध्या परिस्थिती जरी योग्य नसली, तरी तणावपूर्व वातावरण नक्कीच कमी होईल आणि कुठलातरी मध्यममार्ग निघण्याची शक्यता आहे.अमेरिका आणि चीनमधील या बैठकीकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जातंय की, जरी या दोन देशातील संबंध चांगले नसले, तरी हा तणाव हे दोन्ही देश वाढवू इच्छित नाहीत.चीनने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीला 'रचनात्मक बैठक' म्हटलंय.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

"हाँगकाँग, तैवान आणि शिन्जियांग या प्रकरणांमध्ये अमिरेकने हस्तक्षेप करू नये. कारण ही चीनची अंतर्गत प्रकरणं आहेत," असं यांग यांनी अमेरिकेला सांगितलंय.
याच बैठकीत पोम्पिओ यांनी चीनला सांगितलं की, कोव्हिड-19 संबंधीची सर्व माहिती पारदर्शकपणे द्यावी.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








