Bois Locker Room: इन्स्टाग्रामवर अश्लील चर्चा करणाऱ्या मुलांचा ग्रुप असा झाला उघड, एकाला अटक

महिला
    • Author, सुशिला सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम ग्रुप बनवला. तिथे त्यांच्याबद्दल नको-नको ते बोलले, त्यांचे आक्षेपार्ह फोटो टाकले, काही छेडछाड केलेलेसुद्धा, आणि अगदी त्यांच्यावर बलात्कार करायची अनेकांनी इच्छाही व्यक्त केली.

फक्त मुलामुलांच्या या ग्रुपमध्ये काही जणांनी हॅकिंगद्वारे प्रवेश मिळवला आणि या ग्रुपचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला.

इन्स्टाग्रामच नव्हे तर आता ट्विटर, फेसबुकवरही प्रतिक्रियांचा पूर आला आणि ट्रेड झालं #BoysLockerRoom (#BoisLockerRoom). जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर सोमवारपासून सुरू असलेला हा ट्रेंड तुम्ही पाहिलाच असेल.

एक लक्षात घ्यायला हवं, की ही सर्व मुलं दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटंबांमधून आहेत, उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेले. ते ज्या मुलींबद्दल बोलत आहेत, त्याही त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या आहेत. आणि हे सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले आहेत. म्हणजे अल्पवयीन.

मात्र सोमवारी दिवसभर ही घटना सोशल मीडियावर ट्रेड झाल्यानंतर, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी इन्स्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना नोटीस धाडली आहे.

'बॉईज लॉकर रूम'शी संबंधित असलेल्यांना तातडीनं अटक करावी, अशी मागणी त्यांनी केल्यानंतर मंगळवारीसुद्धा यावर चर्चा सुरू आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

स्वाती मलीवाल यांच्या ट्वीटनंतर तातडीनं पावलं उचलत, दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागानं या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींपैकी 15 वर्षीय मुलाला दिल्ली पोलिसांनी अटकही केलीय. स्वाती मलीवाल यांनीच याबाबत ट्विटरवरून माहिती दिली.

कायदा काय सांगतो?

'BoysLockerRoom'सारख्या प्रकरणामागे दोन हेतू असू शकतात - एक म्हणजे मुलींना फसवणं आणि दुसरा म्हणजे मुलींची प्रतिमा मलीन करणं.

इन्स्टाग्राम

फोटो स्रोत, Getty Images

असे गुन्हे भारतीय दंडसंहितेच्या कलम 468 आणि 469 अंतर्गत येतात. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी असतील तर त्यांना बालसुधारगृहात पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांना आता इन्स्टाग्रामकडून माहिती घ्यावी लागेल, जी पुरवणं इन्स्टाग्रामला तंत्रज्ञान कायद्यान्वये बंधनकारक आहे.

सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या म्हणण्यांनुसार, "लॉकडाऊनच्या काळात मुलं घराबाहेर पडत नाहीत आणि घरात राहून आई-वडिलांशीही बोलत नाहीत. अशा वेळी इंटरनेटवरच ते अधिक काळ घालवतात. गेल्या 40 दिवसात मुलं डार्क वेबसाईटवर वारंवार गेल्याची शक्यता अधिक आहे."

"Boys Locker Room शी संबंधित मुलं अल्पवयीन असल्याचे दिसतायत. पण ते प्रौढही असू शकतात. अशावेळी कायद्याचा अडसर नसतो. ज्यावेळी इंटरनेटवर महिलांच्या फोटोवरून अश्लील कंटेट तयार केला जातो, तेव्हा ते प्रकरण माहिती तंत्रज्ञान कायदा 67 च्या अंतर्गत येतं. यात तीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा आहे."

जर अल्पवयीन मुलींच्या फोटोंचा गैरवापर केला गेला असेल तर पाच वर्षाच्या शिक्षेसह दहा लाखांच्या दंडाची तरतूद असल्याचे दुग्गल सांगतात.

भारतीय दंड संहितेनुसार असे गुन्हे करणाऱ्यांविरोधात कलम 345A आणि कलम 292 अन्वयेही कारवाई होऊ शकते. असे गुन्हे मोठ्या कटाचा भाग मानल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारेही कारवाईचा मार्ग आहे.

'मानसिकता बदलण्याची गरज'

#BoysLockerRoom या हॅशटॅगसह फेसबुक, ट्विटरवर या प्रकरणाची चर्चा झालीय.

ट्विटरवरील युजर हर्ष त्रिपाठी म्हणतात, "कठोर कायदा होणं आवश्यक आहे. लोकांची मानसिकता बदलण्याचीही गरज आहे. महिलांना वस्तू म्हणून पाहणं बंद केलं पाहिजे. तरुणांना समजावूनच बदलली जाऊ शकते."

तर आदिती वर्मा म्हणतात, "#BoysLockerRoom ची घटना पाहून मला भीतीच वाटली. 16 वर्षांची मुलं बलात्काराची धमकी देतायेत. ते नक्की काय शिकतायेत? महिलांना वस्तूसारखं पाहणाऱ्या, कमीपणा दाखवणाऱ्या आणि महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांबाबत काहीतरी केलं पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)