दिल्ली हिंसाचार: अंकित शर्मा हत्येप्रकरणी ताहिर हुसेन यांच्याविरोधात एफआयआर

दिल्लीच्या हिंसाचारात ठार झालेले गुप्तचर विभागाचे अंकित शर्मा यांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अंकित यांचे वडील, नातलग आणि शेजाऱ्यांनी अंकित यांच्या मृत्यूसाठी आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसैन दोषी असल्याचा आकोर तेसा आगेय
या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी ताहिर हुसेन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ताहिर हुसेन यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 302 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
26 फेब्रुवारी रोजी अंकित यांचा मृतदेह हिंसाचारग्रस्त चांदबाग भागातल्या एका नाल्यातून काढण्यात आला.
अंकित यांचे वडील रवींद्र शर्मा यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं, "अंकित ऑफिसमधून आल्यावर बाहेर काय सुरू आहे हे बघण्यासाठी गेला. तिथे दगडफेक सुरू होती. तेवढ्यात बिल्डिंगमधून 15-20 मुलं आली आणि माझ्या मुलाला फरफटत घेऊन गेली. 5-6 लोकांना घेवून गेले. जे त्याला सोडवण्यासाठी गेले त्यांच्यावर गोळीबार करयण्यात आला आणि पेट्रोल बॉंब फेकले. कॉलीनीमधल्याच कुणीतरी सांगितलं की तुमच्या मुलाचा मृतदेह इथे आहे. तोवर आम्हाला माहितीही नव्हतं की तो आमचाच मुलगा आहे की इतर कुणी. चांदबाग पुलावर एक मशीद आहे. तर याला इथून घेऊन गेले. 8-10 माणसं होती. त्याला वरून फेकलं. मग वरून काही जणांनी दगड फेकले."
अंकितच्या आईचं रडणं थांबत नव्हतं. त्या सांगत होत्या की त्यांनी अंकीतला चहा घेऊन जायला सांगितलं होतं. बराच वेळ अंकित घरी परतले नाही. तेव्हा कुटुंबीयांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी लिहून घेण्यास टाळाटाळ केली.
अंकित यांचा मृतदेह सापडला. त्याविषयी सांगताना त्यांचे वडील रविंदर सांगतात, "सकाळी दहा वाजता एसीपींनी बॉडी बाहेर काढली. शेजारी राहणाऱ्या कुणीतरी बॉडी फेकताना बघितलं तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं."
ताहीर हुसैन यांच्यावर आरोप करताना रविंदर सांगतात, "ताहीर देशद्रोही आहे. लोक त्याच्या घरावरून दगडफेक करत होते. अंकितवर चाकूने वार केले होते. अंकितची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी जीटीबी हॉस्पिटलला पाठवण्यात आली आहे."
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडियो ट्वीट केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात, "स्थानिकांकडून हिंदूंविरोधात हिंसाचारामध्ये आपचे नगरसेवक ताहीर हुसैन यांची भूमिका असल्याचे व्हिडियो मिळत आहेत. यावरूनच केजरीवाल का गप्प आहेत, हे कळतं. त्यांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली नाही आणि त्या मौलवींशीही बैठक घेतली नाही ज्यांना शांततेचं आवाहन करण्यासाठी सरकार निधी देते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या व्हिडियोत ताहीर, ज्याला ते आपलं ऑफिस असल्याचं सांगतात त्या ऑफिसच्या छतावरून अनेक मुलं हातात लाठ्या-काठ्या घेऊन दगडफेक करताना दिसतात. छतावर एक व्यक्ती पांढरे कपडे आणि हाफ लाल स्वेटर घातलेला दिसतोय. व्हीडिओ शूट करणारे ही व्यक्ती ताहीर हुसैन असल्याचं सांगतात. मात्र, या व्हिडियोची सत्यता बीबीसीने पडताळलेली नाही.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनीदेखील अमित मालवीय यांनी टाकलेला व्हिडियो शेअर केला आहे. 27 फेब्रुवारीला केलेल्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कपिल मिश्रा लिहितात, "खुनी ताहीर हुसैन आहे. केवळ अंकित शर्माच नाही तर इतर चार मुलांनाही ते फरफटत घेऊन गेले होते. त्यातल्या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. व्हिडियोमध्ये स्वतः ताहीर हुसैन तोंडावर रुमाल बांधलेल्या मुलांसोबत काठ्या, दगड, गोळ्या, पेट्रोल बॉम्ब घेऊन दिसत आहे."
26 फेब्रुवारीच्या रात्री आम आदमी पक्षाचा सोशल मीडिया सांभाळणारे अंकिल लाल यांनी एक व्हिडियो ट्वीट केला. यात ताहीर हुसैन आरोपांचं खंडन करताना दिसतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
व्हिडियोमध्ये ताहीर म्हणतात, "माझ्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या बातम्या साफ खोट्या आहेत. "
"मला बदनाम करण्याचं घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषणं केली तेव्हापासून दिल्लीतली परिस्थिती चिघळली आहे. ठिकठिकाणांहून दगडफेकीच्या घटना ऐकू येत आहेत. परवा आमच्या भागातही असंच घडलं. आम्ही पोलिसांना त्याची माहिती दिली. एक जमाव माझ्या ऑफिसचं गेट तोडून छतावर गेला. त्यानंतर मी सतत पोलिसांना मदत मागत होतो. जे अधिकारी इथे हजर होते त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. पोलिसांनीच माझ्या संपूर्ण कुटुंबाला इथून सुरक्षित बाहेर काढलं."
यापुढे ताहीर म्हणतात, "मी पोलिसांना विनंती केली की इथून फोर्स काढू नका. पोलीस बळ काढल्यास माझ्या बिल्डिंगचा पुन्हा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आम्ही 5-7 जणांनी दरवाजा तुटू नये म्हणून प्रयत्न केला. पण त्यांनी दरवाजा तोडला. पोलीस तिथून गेल्यावर दंगलखोरांनी तेच केलं ज्याची मला भीती होती. मी एक सच्चा आणि चांगला मुसलमान आहे आणि हिंदू-मुस्लिम बंधुभावासाठी काम करतो. मी आयुष्यात कुणाचं नुकसान करू शकत नाही. मी माझ्या मुलांची शपथ घेतो. असं घाणेरडं राजकारण मी कधीच केलं नाही आणि करणारही नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
ताहीर 2017 साली पूर्व दिल्लीतल्या नेहरू विहार भागातल्या 059-E वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. व्यवसायाने ते व्यापारी आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे 18 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांच्याविरोधात कुठल्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. यापूर्वी ते कुठलीच निवडणूक लढलेले नाही. 2017 साली दिलेल्या माहितीनुसार ते आठवी उत्तीर्ण आहेत आणि मुक्त विद्यापीठातून दहावीचं शिक्षण घेत आहेत.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)