You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020 Time Table : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा मुकाबला
IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे.
IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. या सामन्यांचं वेळापत्रक आम्ही पुढे दिलं आहे.
उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.
IPL च्या लिलावानंतर सर्वच संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर सर्वाधिक चार तर चेन्नई सुपर किंग्स तीन जेतेपदं आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला यंदाच्या लिलावात 15.5 कोटी एवढी प्रचंड बोली लागली होती. सर्वाधिक बोली लागणारा विदेशी खेळाडू ठरण्याचा मान आता कमिन्सच्या नावावर आहे.
IPL 2020 वेळापत्रक - प्राथमिक फेरी
IPL विजेते संघ
IPL 2020 संघ
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), इम्रान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, मुरली विजय, केदार जाधव, रवींद्र जडेजा, दीपक चहर, पीयुष चावला, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दूल ठाकूर, आर.साई किशोर, फॅफ डू प्लेसिस, मोनू कुमार, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवूड, सॅम करन, करण शर्मा
दिल्ली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टोनिअस, संदीप लमाचीने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमेयर, अॅलेक्स कॅरे, जेसन रॉय, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा.
किंग्ज इलेव्हन पंजाब- लोकेश राहुल (कर्णधार), अर्षदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नालकांडे, कृष्णप्पा गौतम, हार्डुस व्हिलजोन, हरप्रीत ब्रार, जगदीश सुचिथ, करुण नायर, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सर्फराज खान, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डॉन कॉट्रेल, दीपक हुडा, इशान पोरेल, रवी बिश्नोई, जिमी नीशाम, ख्रिस जॉर्डन, ताजिंदर सिंग, सिमरन सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स - दिनेश कार्तिक (कर्णधार), शिवम मावी, संदीप वॉरिअर, कुलदीप यादव, इऑन मॉर्गन, पॅट कमिन्स, हॅरी गुर्ने, सुनील नरिन, निखिल नाईक, एम. सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रसिध कृष्णा, शुभमन गिल, नितीश राणा, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, प्रवीण तांबे, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कीरेन पोलार्ड, दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टिअर नील, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, लसिथ मलिंगा, राहुल चहर, ख्रिस लिन, शेरफेन रुदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंग, मोहसीन खान, मिचेल मक्लेघान, प्रिन्स बलवंत राय सिंग, अनुकूल रॉय, इशान किशन.
राजस्थान रॉयल्स- स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल टेवाटिया, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओशाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलर, जोस बटलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जोश फिलीपे, मोईन अली, आरोन फिंच, शाहबाझ अहमद, पार्थिव पटेल, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसरु उदाना, डेल स्टेन, पवन नेगी, देवदत्त पडीकल, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे. केन रिचर्डसन.
सनरायझर्स हैदराबाद- केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, संजय यादव, वृद्धिमान साहा, खलील अहमद, संदीप शर्मा, अब्दुल समद, मिचेल मार्श, श्रीवत्स गोस्वामी, मोहम्मद नबी, फॅबिअन अॅलन, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, बिली स्टॅनलके, संदीप बवन्का, भुवनेश्वर कुमार, विराट सिंग, टी. नटराजन, शाहबाझ नदीम, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, प्रियम गर्ग.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)