अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बेबी मफलरमॅन'चाच बोलबाला

राघव चढ्ढा

फोटो स्रोत, TWITTER/ @AamAadmiParty

फोटो कॅप्शन, राघव चढ्ढा आणि बेबी मफलरमॅन

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी पुन्हा एकदा 'बेबी मफलरमॅन'चाच बोलबाला पाहवयास मिळाला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकत आम आदमी पक्षानं घवघवीत यश मिळवलं.

News image

निकालाच्या दिवशी दुपारनंतर 'आप'च्या दिल्लीतल्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. यात एक चिमुकलाही आला होता.

बेबी मफलरमॅन

फोटो स्रोत, TWITTER/@AamAadmiParty

फोटो कॅप्शन, बेबी मफलरमॅन

हा चिमुकला त्या दिवशी चर्चेचा विषय बनला होता. माध्यमांनी त्याचं नामकरण 'बेबी मफलरमॅन' असं केलं होतं.

या 'बेबी मफलरमॅन'ला आम आदमी पक्षानं केजरीवालांच्या शपथविधीसाठी खास आमंत्रण दिलं होतं.

रामलीला मैदानावर 'आप'च्या अनेक नेत्यांनाही 'बेबी मफलरमॅन'सोबत फोटो घेण्याची मोह आवरता आला नाही.

बेबी मफलरमॅन

फोटो स्रोत, TWITTER/@AamAadmiParty

फोटो कॅप्शन, संजय सिंह आणि बेबी मफलरमॅन

आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा, खासदार संजय सिंह यांच्यासोबतचे 'बेबी मफलरमॅन'चे फोटो तर आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.

गेल्यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी विरोधकांनाही निमंत्रणं गेली होती. मात्र, यावेळी कार्यक्रमात विरोधी पक्षातलं कुणी दिसणार नसलं तरी एका खास पाहुण्याला आमंत्रण देण्यात आलं होतं.

कोण आहे हा 'बेबी मफलरमॅन'?

हा पाहुणा आहे 'बेबी मफलरमॅन'. एक वर्षाचं हे बाळ निवडणूक निकालाच्या दिवशी चर्चेत आलं. आम आदमी पक्ष विजयी होणार, असं दिसू लागल्यावर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती.

अरविंद केजरीवाल शपथविधी

फोटो स्रोत, Twitter

तेवढ्यात तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखा पेहराव करून एक वर्षभराचं बाळ आलं. गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी, लाल स्वेटर, डोळ्यांवर चश्मा आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासारखी मिशी असलेला हा क्युट केजरीवाल लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी त्याला 'बेबी मफलरमॅन' असं नावही देऊन टाकलं.

आता आम आदमी पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत या छोट्या केजरीवालला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे.

'मोठा झाल्यावर आव्यानने केजरीवाल यांच्यासारखं व्हावं'

या मुलाचं खरं नाव आव्यान आहे. 11 फेब्रुवारी म्हणजे निकालाच्या दिवशी त्याचे वडील त्याला केजरीवाल बनवून आम आदमी पक्षाच्या कार्यालयात घेऊन गेले होते.

या छोट्या केजरीवालला बघून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. आव्यानचे आई-वडील केजरीवल यांचे समर्थक आहेत. आव्यानने मोठा झाल्यावर केजरीवालसारखं व्हावं, असं त्याच्या आईने म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, EPA

ज्या रामलीला मैदानात 2011 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारविरोधात ऐतिहासिक आंदोलान केलं त्याच रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभेत 70 पैकी 62 जागा जिंकत आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने विजय झाला. भाजपला 8 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

वाचकांच्या प्रतिक्रिया

आपच्या निमंत्रणानंतर 'मफरलमॅन इज बॅक' अशा प्रतिक्रिया ट्विटरवर यायला लागल्या आहेत.

नंदन वशिष्ठ यांनी 'छोटा मफलरमन' असं आव्यानचं वर्णन केलं आहे.

ट्विट

फोटो स्रोत, Twitter

आशुतोष कृष्णा यांनी लिहिलंय, "या शपथविधी सोहळ्याचं या छोट्या बाळालं महत्त्व कळत नसेल, पण भविष्यात त्याला याचा अभिमान वाटेल की तो भविष्यातील पंतप्रधानासोबत व्यासपीठावर होता."

अरविंद केजरीवाल शपथविधी

फोटो स्रोत, TWITTER

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)