Padma Awards 2020 Full list: पद्म विभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांची संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, 'बीजमाता' राहीबाई पोपेरे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार आणि पुण्यातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सय्यद मेहबूब शाह कादरी यांना यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, उडुपी पीठाचे विश्वेश्वरतीर्थ स्वामी श्री पेजावर यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.

याशिवाय, खेळाडू एम. सी. मेरी कोम, मॉरिशसचे माजी राष्ट्राध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येईल.

याबरोबरच उद्योजक आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

देशविदेशातील 118 व्यक्तींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. यामध्ये क्रिकेटपटू जहीर खान, पोपटराव पवार, डॉ. रमण गंगाखेडकर, सरिता जोशी, राहीबाई पोपोरे, सँड्रा डिसूझा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

अभिनेत्री कंगणा राणौत, निर्माते करण जोहर आणि एकता कपूर, गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पाहा संपूर्ण यादी

पद्मविभूषण पुरस्कार

पद्मभूषण पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)