उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार, सरकारला 100 दिवस पूर्ण होण्याचं निमित्त

उद्धव ठाकरे त्यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होताच पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

याआधी उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा अयोध्येला भेट दिली आहे. पहिल्या भेटीत त्यांनी शरयू नदीची आरतीसुद्धा केली होती. दुसरी भेट मात्र अटोपशीर ठेवली होती.

आता मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या तिसऱ्या अयोध्या दोऱ्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे मनसेनं 23 जानेवारीला त्यांच्या पक्षाचं महाअधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा बदललेला झेंडा आणि पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

त्यामुळे शिवसेनेच्या या घोषणेकडे त्यादृष्टीकोनातून पाहिलं जात आहे.

राहुल गांधी यांनी सुद्धा अयोध्येला यावं असं संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)