You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Year End : 'या' कामांसाठी 31 डिसेंबर आहे शेवटची तारीख
आज 31 डिसेंबर 2019. या वर्षातला शेवटचा दिवस. आजच्या दिवशी सेलिब्रेशनचे प्लॅन असले तरी काही कामांसाठीदेखील हा दिवस महत्त्वाचा आहे.
त्यामुळे तुम्ही ही कामं पूर्ण केली नसतील, तर ती लवकरात लवकर पूर्ण करायला हवी.
1. ITR
31 ऑगस्ट 2019 पर्यंत तुम्ही ITR (आयकर परतावा) फाईल केला नसेल,तर 31 डिसेंबर तुमच्यासाठी योग्य दिवस आहे. जर तुम्ही यानंतर ITR फाईल केला तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
कर कायदा 1961च्या कलम 234 नुसार, 31 डिसेंबरपूर्वी ITR भरल्यास 5 हजार रुपये आणि त्यानंतर 10 हजार रुपये दंड ठोठावला जातो. त्यासाठी या दंडाची रक्कम कमी व्हावी म्हणून आजच ITR भरा.
2. SBI चं ATM आणि डेबिट कार्ड
तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) खातं असेल आणि तुम्ही बँकेच्या ATM आणि डेबिट कार्डचा वापर करत असाल, तर 31 डिसेंबर ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
ग्राहकांनी जुने मॅग्नेटिक ATM आणि डेबिट कार्ड बदलावेत, अशी माहिती SBIनं ट्वीट करून दिलं आहे. यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
आता नवीन कार्ड EMV किंवा पिन क्रमांकावर आधारित असेल.
तुमचं एटीएम कार्ड जुनं असेल, तर नवीन वर्षापासून तुम्ही त्यातून पैसे काढू शकणार नाहीत. ज्या लोकांनी नवीन कार्डासाठी अर्ज केला आहे, पण अजून त्यांना ते मिळालं नसेल, तर बँकेत जाऊन विचारणा करायला हवी.
3. अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख
तुम्ही ईशान्य भारतात राहत असाल आणि अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरलेला नसेल, तर तुमच्याकडे एक दिवस शिल्लक आहे.
ईशान्य भारतातील राज्यांसाठी अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 आहे. यापूर्वी ही मुदत 15 डिसेंबर होती. नंतर ती वाढवण्यात आली.
4. ITR ची पडताळणी
तुम्ही आतापर्यंत ITR रिटर्नची पडताळणी केली नसेल, तर ती 31 डिसेंबरपूर्वी करायला हवी. कर कायद्यानुसार, रिटर्न पडताळणीसाठी रिटर्न फाईल केल्यानंतर 120 दिवसांचा कालावधी दिला जातो.
कर विभागानं ITR रिटर्न फाईल करण्याची तारीख 31 जुलै 2019पासून वाढवत 31 ऑगस्ट 2019 केली होती. त्यामुळे आता रिटर्नची पडताळणी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)