विधानसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर; एकनाथ खडसे, विनोद तावडेंचं नाव नाही

भाजप, निवडणुका, मोदी, शहा, फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली.

विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रकांत बावनकुळे यांचं नाव नाहीये.

वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपनं बारामतीमधून उमेदवारी दिली आहे. गोपीनाथ पडळकर हे अजित पवारांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात असतील.

भाजप दुसरी यादी

फोटो स्रोत, BJP

केजमधून भाजपनं नमिता मुंदडांना उमेदवारी दिली आहे. नमिता मुंदडांना राष्ट्रवादी काँग्रेसनं केजमधूनच उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

लातूर शहर मतदारसंघातून शैलेश लाहोटींना उमेदवारी देण्यात आली आहे. ते काँग्रेसच्या अमित देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवतील.

भाजपनं मंगळवारी (1 ऑक्टोबर) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 125 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, कसबा पेठेतून मुक्ता टिळक, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर ही घोषणा होणार होती, मात्र ते मायदेशी परतल्यानंतरही भाजपच्या उमेदवार यादीचा सस्पेन्स कायम होता. मंगळवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर एका पत्रकाद्वारे शिवसेना-भाजप युतीची घोषणा करण्यात आली.

भाजप, निवडणुका, मोदी, शहा, फडणवीस
फोटो कॅप्शन, युतीचा फॉर्म्युला

भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्यं

  • पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रकांत बावनकुळे यांचं नाव नाही
  • नवी मुंबईतून मंदा म्हात्रे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब
  • अतुल भोसले यांना कऱ्हाडमधून उमेदवारी
  • कसबा पेठेतून मुक्ता टिळक यांना संधी
  • 12 महिला उमेदवारांना संधी
  • पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात दिलीप कांबळे यांच्याऐवजी सुनील कांबळे यांना संधी
  • सरदार तारासिंग यांचा समावेश नाही
  • वडाळ्यातून कालिदास कोळमकर यांना संधी
  • राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे यांनाही संधी
  • मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी

संपूर्ण यादी

भारतीय जनता पक्षाच्या यादीबाबत प्रचंड उत्सुकता होती. शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली असून त्यातूनच त्यांचे उमेदवार जाहीर होत आहेत. जवळपास 80 हून अधिक उमेदवारांना शिवसेनेकडून एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी जागावाटप मात्र अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या यादीबाबत उत्सुकता आहे.

भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या संख्येनं नेते पक्षांतर करून आलेले आहेत. यापैकी किती नेत्यांना उमेदवारी मिळणार, कोणकोणत्या मतदारसंघात भाजपकडून नव्यानं आलेल्या उमेदवारी मिळणार आणि कोणकोणत्या मतदारसंघात पक्षातील जुन्या नेत्यांना उमेदवारी मिळणार याचीही उत्सुकता आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)