चांद्रयान 2: इस्रो प्रमुख के सिवन - शेतकऱ्याचा मुलगा ते 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया'

सिवन

फोटो स्रोत, ANI

"समाजाच्या भल्यासाठी उपयोगी ठरेल, असा सॅटेलाईट मला विकसित करायचा आहेत," हे स्वप्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख के. सिवन यांचं.

सध्या देशभरात चांद्रयान मोहिमेची चर्चा सुरू असताना के. सिवन कोण आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील मूनलँडर 'विक्रम'चा संपर्क तुटल्यानंतर शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. त्यानंतर ते इस्रोच्या मुख्यालयातून निघू लागले, तेव्हा के. सिवन जरा भावूक झाले.

पाहा व्हीडिओ

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रो प्रमुख आणि चांद्रयान मोहिमेचे नायक, अशी ओळख बनलेल्या सिवन यांच्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आणि म्हणून तसा हळवा करणारा नक्कीच होता.

कैलासावाडिवू सिवन यांचा जन्म 14 एप्रिल 1957ला तामिळनाडूतल्या कन्याकुमारी जिल्ह्यातल्या सारकलविलई गावात झाला. त्यांच्या कुटुंबातले ते पहिलेच पदवीधर आहेत.

"मी एका गरीब कुटुंबातला आहे. मला शिकता यावं म्हणून माझ्या मोठ्या भावानं शिक्षण थांबवलं. माझे वडील कैलासा वाडिवू शेतकरी होते आणि बाजारात आंबे विकायचे. मीही सायकलवरून आंबे बाजारात घेऊन जायचो आणि विकायचो. त्यातून आलेल्या पैशांतून शाळेची फी भरायचो," असं इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

के. सिवन यांनी गावातल्याच सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. "मी उच्च माध्यमिक शिक्षण स्कॉलरशिपच्या मदतीनं पूर्ण केलं. यासाठी माझ्या वडिलांनी काही शेतजमीन विकावी लागली. आता माझे वडील आणि आई चेल्लम दोघंही या जगात नाहीत," असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.

1982 साली त्यांनी Polar Satellite Launch Vehicle किंवा PSLV प्रकल्पातून इस्रोत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अद्ययावत केलेल्या याच तंत्रज्ञानाने आज मोठमोठे उपग्रह प्रक्षेपित करण्याचा पाया रचला.

के. सिवन हे रॉकेट प्रक्षेपणात आणि त्यांच्या मार्गनिरीक्षणाचे तज्ज्ञ आहेत, असं त्यांचे सहकारी सांगतात.

के. सिवन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, के. सिवन

"मी सितारा नावाचं सॉफ्टवेअर लिहिलं आणि ते रॉकेटचं प्रक्षेपण नियंत्रित करण्यासाठी वापरात येऊ लागलं," असं सिवन सांगतात. यानंतरच सिवन अवकाश संशोधन क्षेत्रात प्रकाशझोतात आले.

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील क्रायोजेनिक इंजिनच्या विकासातील योगदानामुळे त्यांना 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया' अशी नवीन ओळख मिळाली. यानंतर त्यांनी इस्रोच्या GSLV मोहिमेची धुरा सोपवण्यात आली. ती त्यांनी यशस्वी करून दाखवली.

तुमचं स्वप्न काय आहे, या प्रश्नावर के. सिवन यांनी सांगितलं, "भविष्यातील अंतराळ मोहिमा आधीच ठरवण्यात आल्या आहेत आणि आम्हाला त्या पूर्ण करायच्या आहेत. समाजाच्या भल्यासाठी उपयोगी ठरेल, असे सॅटेलाईट मला विकसित करायचे आहेत."

के. सिवन यांची कारकीर्द

  • 1980मध्ये Madras Institute of Technologyमधून एरोनॉटिकल इंजीनियरिंगमधून पदवी.
  • 1982मध्ये बंगळुरूच्या Indian Institute of Scienceमधून एरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी.
  • 2006मध्ये IIT मुंबईतून एरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये पी.एचडी.
  • 1982 मध्येच इस्रोच्या PSLV मोहिमेत सहभाग.
  • 2014मध्ये सत्याभामा युनिव्हर्सिटीकडून Doctor of Science पुरस्कार तर 1999मध्ये Dr Vikram Sarabhai Research अवॉर्ड
  • 2015मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी निवड
  • जानेवारी 2018मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी निवड.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)