मुंबई पाऊस: रविवारीही संततधार कायम राहणार; पालघर, रायगडमध्ये रेड अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
शनिवारी मुंबई आणि परिसरात दणकून बरसणाऱ्या पावसाची संततधार रविवारीही कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना दोन दिवस मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत 26 जुलै ते 27 जुलै या कालावधीत झालेला पाऊस हा गेल्या दहा वर्षांमधील जुलैमधील सर्वाधिक पाऊस होता. सांताक्रुझ इथं 219 तर कुलाबा इथं 90 मिमी पावसाची नोंद झाली.
जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील दिवा, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण भागात पूरसदृश परिस्थिती होती.
रायगड जिल्ह्यात सर्व नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे महाड, नागोठणे, रोहा, नेरळ परिसराला पुराचा तडाखा बसला. पनवेल शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापालिका प्रशासनाने शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.
दरम्यान, पुणे परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणक्षेत्रात पावसाने हजेरी लावली. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणातील एकत्रित पाणीसाठा 18.11 अब्ज घनफूट म्हणजेच 62.11 टक्के एवढा झाला आहे.
मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू होती.
दुसरीकडे, परशुराम घाटात रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक ठप्प झाली आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
परशुराम ते पीरलोटे दरम्यान हॉटेल ओमेगा इन जवळ दुपारी 03 वाजता ही घटना घडली. इथली माती बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी शनिवारी सांगितलं होतं.
पावसाचा जोर कायम राहिल्याने कोकण रेल्वेलाही फटका बसला. या मार्गावर इंदापूर ते गोरेगाव दरम्यान रुळावर पाणी साचलं होतं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक गाड्या विविध स्टेशनांमध्ये नियंत्रित करण्यात आल्या होत्या.
उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका शुक्रवारी मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला बसला. पुराने वेढलेल्या गाडीतील सुमारे हजार प्रवाशांच्या सुटकेसाठी लष्कर, नौदल तसंच NDRFने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि नऊ गर्भवती महिलांसह सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
दरम्यान परभणीत झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. येत्या 24 तासात नागपूरसह विदर्भातील अनेक भागात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
एक-दोन दिवसांच्या उघाडीनंतर 31 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालची खाडी आणि लगतच्या क्षेत्रात चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत हा बदल होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








