वर्ल्ड कप 2019: भारत-पाकिस्तान मॅचवरचे हे 16 ट्वीट्स पाहून तुम्ही पोट धरून हसाल

रविवारी भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्ल्ड कप सामन्यात विजय मिळविला. यावरून चिडलेल्या पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्याच टीमची खिल्ली उडवली, पण कुठेही अतिआक्रमक न होता. उलट त्यांचे व्यंगात्मक ट्वीट्स पाहून तुम्ही हसून हसून थकाल.

सर्फराझने घेतलेली जांभई, शोएब मलिकचा भोपळा आणि इतर खेळाडूंनी टाकलेल्या विकेट्स, या सगळ्यांची चर्चा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर आहेच. पण त्याबरोबरच भारताच्या विजयानंतर पाकिस्तानमध्ये ट्विटरवर #CongratulationsIndia हा ट्रेंड ही पाहायला मिळाला.

सर्फराझवर टीका करत असताना अनेकांनी विराट कोहलीच्या कॅप्टनसीचंही कौतुक केलं. याशिवाय भारतीय चाहत्यांनी केलेले काही ट्वीटस पण सोशल मीडियावर चर्चेत आले. पाहूयात काही निवडक ट्वीटस.

इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसन यांचं मॅच अपडेट देणारं एक ट्वीट रिट्वीट करताना ओमर या ट्वीटर हॅंडलवरून 'भाई, हमारी तो चलो टीम है. पर तुम लोग क्यों देखते हो इन *#@* को' म्हणत सगळा राग व्यक्त केला आहे.

भारताचा 336 धावांचा डोंगर पाहून याच ओमरने आणखी एक ट्वीट केलं होतं - 'क्या फायदा इस स्कोर का जब हमें 105 बनाना है'.

कोमल सलमान म्हणते, 'विराट कोहलीची बॉडी लॅंग्वेज पाहून असं स्पष्ट वाटतं की तो कॅप्टन आहे. उलट सर्फराझकडे पाहून असं वाटतं त्याला पहाटेच्या अजानच्या पाच मिनिटांआधी कुणीतरी झोपेतून सहरीसाठी उठवलंय."

'खबीस औरत' यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय 'एक होता है ताहीर शाह वाला कान्फिडंस. फिर होता है मरीयम नवाजवाला कॉन्फिडन्स. फिर आता है 'पाकिस्तान चूस टू फिल्ड'वाला कॉन्फिडन्स.'

'एक्स्ट्रिमिस्ट' या हँडलवरून काही ट्वीट करण्यात आले आहेत. एका ट्वीटमध्ये म्हटलंय, 'किसी ने सही कहा है. पाकिस्तान बाँलिंग करे तो लगता है बॅटिंग पिच है और बॅटिंग करे तो लगता है बॉलिंग पिच है'.

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये भारताच्या क्रिकेटर्सना विनंती करण्यात आली आहे. "थोडा सावकाश खेळा. आमचा सर्फराझ रडून देईल आता."

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी "भारताने पाकिस्तानला नमवलं... मैदानावरच्याच नव्हे तर मानसिक खेळातही," हे ट्वीट केलं होतं. त्यावरूनही काहींनी त्यांना ट्रोल केलंय.

अहमद म्हणतो 'ऊपर से तुम्हारी मनहूस कॉमेंटरी. हमारी कोई दुआही कबूल नहीं होती.'

आदिल म्हणतो, "भारत पाकिस्तानला असा धुत आहे जसं आम्ही IMF (जागतिक नाणेनिधी) कडून नाही, त्यांच्याकडूनच कर्ज घेतो."

वसीम चौधरीने सर्फराझचा तो जांभईवाला फोटो एडिट करून शेअर केला आहे. त्यात सर्फराझ पांघरुणात दिसतोय.

ओमरने पाकिस्तानी टीमचं नेतृत्व करणाऱ्या सर्फराझ याला दर्शविणारा एक फोटो शेअर केला आहे.

फहाद खानने 'मंडे मूड' म्हणत सर्फराझचा एडिट केलेला एक फोटो टाकला आहे.

अलीना म्हणते, 'ना पार्टिशन होता, ना हम जलील हो रहे होते.'

एका ट्विटर हँडलवरून भारतीय आणि पाकिस्तानी खेळांडूंची तुलना करण्यात आली. "मला देशद्रोही म्हणू नका, पण भारताचे खेळाडू हे खेळाडूंसारखे दिसतात. पाकिस्तानचे खेळाडूंना पाहिलं की असं वाटतं त्यांनी न्याहरीसोबत लस्सी आणि कुल्फा ठासून खाल्लाय."

शिराझ हसनने भारतीय बॅटिंगचं कौतुक करताना म्हटलं आहे की 'डॉलर का रेट और इंडिया के रन कंट्रोल करना हमारे बस की बात नहीं.'

राशीदने सर्फराझचा जांभई देणारा फोटो शेअर करत "मॅच झाल्यानंतर मला उठवा" असं कॅप्शन दिलं आहे.

पण ही ट्विटरवरची मजा फक्त पाकिस्तानच्या बाजूनेच झालेली नाही. काही भारतीय चाहत्यांनी ट्वीट केले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)