नरेंद्र मोदी सरकार 2.0 : अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 58 मंत्र्यांनी घेतली शपथ
पाहा हा शपथविधी सोहळा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमडळात यंदा भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, रामविलास पासवान यांचा समावेश होता.

फोटो स्रोत, Twitter / Narendra Modi
भाजपसह शिवसेना, अकाली दलासारख्या रालोआतील इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत.
सर्वांत ताजे अपडेट्स

फोटो स्रोत, ANI
विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलंय. पण या सगळ्या उत्सवी वातावरणापासून नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन या मात्र दूर आहेत आणि अलिप्तही. जसोदाबेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचं आमंत्रण नाहीये आणि त्या टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहणार नाहीयेत नाहीत. असं का? वाचा ही बातमी

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India
दरम्यान, मोदी यांच्या आई हिराबेन यांनी हा सोहळा त्यांच्या घरी पाहिला. भाजपने त्यांचा हा सोहळा पाहतानाचा फोटो शेअर केला आहे.

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India
- मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन या आजचा शपथविधी सोहळा पाहणार नाही आहेत. अधिक माहितीसाठी वाचा ही बातमी
- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
- मावळत्या सरकारमधल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज कार्यक्रमाला पोहोचल्या. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही आणि यंदा त्या मंत्रिमंडळात असतील की नाही, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान, बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तीश यांना या शपथविधी सोहळ्याविषयी काहीतरी सांगायचंय...

- या शपथविधीसाठी मॉरिशस, किरगिस्तान आणि बिमस्टेक (अर्थात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान), या देशांचे प्रमुखही उपस्थित.
- नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड तसंच अपना दल हे पक्ष मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ एकच पद मिळाल्यानं नितीश कुमार नाराज असल्याचं वृत्त आहे. नितीश कुमार सोहळ्याला उपस्थित.

फोटो स्रोत, ANI
- आज शपथ घेणारे संभाव्य मंत्री 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान निवासस्थानी संध्याकाळी 4.30 वाजता नरेंद्र मोदी यांना भेटले.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणते चेहरे?
गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदे कायम राहातील असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं मानलं जात आहे.
गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती.
आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
दरम्यान, उत्तर गोवा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेत जाणारे श्रीपाद नाईक यांना यंदा पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं.

फोटो स्रोत, ANI
पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले नाईक यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "मी आभार मानतो पंतप्रधान मोदींचे की त्यांनी मला पुन्हा सरकारमध्ये घेऊन देशसेवेची संधी दिली. मला शपथविधीसाठी बोलावणं आलं आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलं खातं मिळेल, हे सांगण्यात आलेलं नाही."
शेजारी राष्ट्राध्यंक्षांचं आगमन
या देशांच्या अध्यक्षांचं आगमन या शपथविधी सोहळ्यासाठी होऊ लागलं आहे.

फोटो स्रोत, Twitter / @IndianDiplomacy

फोटो स्रोत, Twitter / IndianDiplomacy

फोटो स्रोत, Twitter / IndianDiplomacy

फोटो स्रोत, Twitter / IndianDiplomacy

फोटो स्रोत, Twitter / IndianDiplomacy
ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार नाहीत
"शपथविधी कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकशाहीचा सन्मान कमी करण्याचा नाही," असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीला उपस्थित राहाण्यास नकार दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचं अभिनंदन. घटनात्मक आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी कार्यक्रमाला येण्याचा माझा विचार होता. मात्र भाजपकडून बंगालमधील राजकीय हिंसाचारात 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. हे धादांत खोटं आहे," असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना वंदन केले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला नमन केले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळालाही भेट दिली.

फोटो स्रोत, Twitter / @NarendraModi
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)