दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला CBIने तातडीने चालू करावा – हमीद दाभोलकर

फोटो स्रोत, facebook
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. आज त्यांच्या हत्येला 7 वर्षं पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांच्या हत्येचा तपास 2014 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
7 वर्षं उलटूनही सीबीआयकडून हा तपास पूर्ण झालेला नाही. डॉ. दाभोलकर खून प्रकरणाचा तपास वेगाने झाला असता तर कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंताचे खून टळले असते, अशी प्रतिक्रिया डॉ. दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.
हमीद दाभोलकर म्हणतात, "सीबीआय तपासातून नरेंद्र दाभोलकर खुनाच्या तपासात गेल्या सात वर्षांच्या मध्ये संशयित मारेकरी आणि त्यांना मदत करणारे लोक यांना अटक झाली आहे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे उशिराने का होइना सीबीआयने योग्य दिशेने तपास केला. हा तपास अधिक वेगाने झाला असता तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्यांचे खून टळले असते. डॉ. दाभोलकर प्रकरणातील संशयित बंदुकीची तपासणी लवकर करून सीबीआयने आता खटला तातडीने चालू करणे आवश्यक आहे."
सुरुवातीला हा तपास पुणे पोलीस आणि एसआयटीने मिळून केला. मात्र, वर्षभरातच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने संशियत म्हणून 2016 मध्ये डॉ. विरेंद्र तावडे त्यानंतर 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे तर 2019 मध्ये वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली होती. मात्र, खुनाचे सूत्रधार कोण, हे अजूनही कळू शकलेलं नाही.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासारखी होऊ नये, असं म्हणत पवार यांनी दाभोलकर हत्याप्रकरणातल्या तपासावरही नाराजी व्यक्त केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद पवार यांनी एक पत्रकही जारी केलेलं आहे. या पत्रकात ते लिहितात, "डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 7 वर्षं पूर्ण झाली. पण 7 वर्षांनंतरही सीबीआयसारख्या प्रतिष्ठीत तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणं ही वेदनादायी बाब आहे."
मार्च महिन्यात सापडलं होतं पिस्तुल
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल समुद्रात सापडल्याची माहिती मार्च 2020मध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती
नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तुल सीबीआयने शोधल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली होती. एएनआय़ने केलेल्या ट्वीटमध्ये हे पिस्तुल नक्की त्याच हत्येसाठी वापरले होते का याची तपासणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यापुर्वी संजीव पुनाळेकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
पुनाळेकर आणि भावे यांच्या अटकेचा सनातन संस्थेनी निषेध केला होता.
विक्रम विनय भावे हे गडकरी रंगायतन स्फोटातले दोषी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर होते. विक्रम भावे हे हिंजू विधिज्ञ परिषदेचं काम करतात. ते परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत अशी माहिती सनातनच्या प्रवक्त्यांनी दिली होती.
कोण आहेत पुनाळेकर ?
संजीव पुनाळेकर हे हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव आहेत. पुनाळेकर यांनी सनातन संस्थेसंदर्भातल्या अनेक खटल्यांमध्ये सनातनची बाजू कोर्टात मांडली आहे. पुनाळेकर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे या हत्या प्रकरणातील आरोपींची बाजू कोर्टात मांडली आहे.

सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी या अटकेचा निषेध केला आहे. पुनाळेकर यांनी अनेक जनहितयाचिका दाखल केल्या. त्यांनी हिंदुत्वासाठी खूप कार्य केलं आहे. सनातन त्यांच्या पाठीशी उभं आहे, हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं मत राजहंस यांनी व्यक्त केलं.
त्यांना झालेली अटक ही त्यांच्याविरुद्ध रचलं गेलेलं षड्यंत्र आहे असं राजहंस यांनी सांगितलं. 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची बाजू कोर्टात मांडली होती. पुनाळेकरांनी 'भगवा आतंकवाद' अशी कोणतीही गोष्ट नाही असं सिद्ध केलं होतं. भगव्या आतंकवादाचा खोटेपणा त्यांनी सिद्ध केला होता आज त्यांनाच अटक झाली हे धक्कादायक आहे असं राजहंस यांनी म्हटलं.
अवैध शस्त्रसाठा सापडल्या प्रकरणी नालासोपारा येथून सनातनशी संबंधित कार्यकर्ता वैभव राऊत यांना अटक झाली होती. त्यांची बाजूही पुनाळेकर यांनी मांडली होती.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा आजवरचा तपास
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जेव्हा या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि महाराष्ट्र ATS मिळून करत होते. पण त्यात फार काही निष्पन्न होताना दिसलं नाही आणि मे 2014 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. एका याचिकेद्वारे उच्च न्यायालय या तपासावर लक्ष ठेवून आहे.

फोटो स्रोत, facebook
CBIनं त्यांच्या तपासाअंतर्गत सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे याला अटक केली होती. सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू होताच.
दरम्यान, 'सनातन संस्थे'ने CBI च्या या तपासावर याआधी आक्षेप नोंदवला आहे.
"हा संपूर्ण तपास भरकटलेला आहे. CBI कडे कोणतेही पुरावे नाहीत. खरे मारेकरी पकडले जात नाहीत म्हणून 'सनातन'ला लक्ष्य केलं जात आहे. खटला वेगानं चालू दिला जात नाही आणि दिवस काढले जात आहेत," असे 'सनातन संस्थे'चे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसीला यापूर्वी सांगितलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








