नागपूर लोकसभा निकाल : नितीन गडकरी की नाना पटोले - कोण बाजी मारणार?

नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी, अशी थेट लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.

फोटो स्रोत, Facebook / Getty Images

फोटो कॅप्शन, नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी, अशी थेट लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.

नागपूरमध्ये नितीन गडकरी 1 लाख 11 हजार 132 मतांनी आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना हरवून लोकसभेत पोहोचलेले नाना पटोले गेल्या लोकसभा निवडणुकीतील 'जायंट किलर' ठरले होते. यावेळेस नाना पटोलेंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नागपूरमधून आव्हान दिलं आहे.

नाना पटोले गेल्या निवडणुकीतला आपला करिष्मा राखणार की विकास कामांच्या जोरावर नितीन गडकरी आपला बालेकिल्ला राखणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

पाहा निवडणूक निकालांचं लाईव्ह कव्हरेज इथे -

गडकरींची लोकप्रियता विरूद्ध नाना पटोलेंचा संघर्ष

नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा पराभव करत दिल्ली गाठली होती. तर नाना पटोले हे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच तिकिटावर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

केंद्रातलं मोदी सरकार हे कृषी प्रश्नावर गंभीर नाही, म्हणत त्यांनी 2017 मध्ये भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरुद्ध बंड पुकारणारे ते देशातले पहिलेच भाजप खासदार ठरले.

2014मध्ये काँग्रेसकडून लढलेल्या विलास मुत्तेमवारांना गडकरींपेक्षा जवळजवळ अर्धी मतं मिळाली होती. त्यामुळे की काय, यंदा मुत्तेमवारांनी स्वतःच न लढण्याचं ठरवून पटोलेंचं नाव दिल्लीला सुचवलं असावं, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांनी पटोलेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर बीबीसी मराठीला दिली होती.

गेल्या पाच वर्षांत देशभरात गडकरींची 'विकास घडवून आणणरा नेता' म्हणून एक प्रतिमा तयार झाली आहे. विरोधकांनीही त्यांच्या कामाचं प्रमाणपत्र संसदेतली बाकं वाजवून दिलंय. नागपुरात त्यांनी अनेक प्रकल्प स्वतः लक्ष घालून पूर्णत्वास नेले आहेत आणि ते कुठल्याही नको त्या वादात सापडलेले नाहीत.

सोनिया गांधींनीही लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

गडकरींविरोधात पटोले स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा वर करू पाहत आहेत, असं त्यांच्या एका ट्वीटवरून दिसतं.

"स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा खुळखुळा तुम्हीच तर वाजवला होता... तुमच्या सभेत त्याची आठवण करून देणाऱ्या कार्यकर्त्यांना थपडं मारण्याची भाषा करता? सत्तेत एवढा माज बरा नाही," असं ते म्हणतात.

पण नाना पटोले गडकरींना टफ फाईट देतील, असंही काही स्थानिक पत्रकारांनी 11 एप्रिल म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाहीत. म्हणून निवडणूक जिंकायची कशी, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. मोदींविरोधात देशभरातल्या 282 खासदारांपैकी कुणीच आवाज उठवला नाही, पण पटोलेंनी ते केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरणार नाही. ही लढत गडकरींची लोकप्रियता विरुद्ध नानांच्या संघर्षाची ताकद, अशी होईल," असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावकेंनी व्यक्त केलं.

व

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)