नरेंद्र मोदींच्या 'सौंदर्य साधने'वर 80 लाखांचा खर्च झाला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
पंतप्रधानांचा मेक-अप सुरू असल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. या व्हीडिओबरोबर 'माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी ब्युटिशियनला दरमहा 80 लाख रूपये देण्यात येतात. असा मेसेज शेअर होत आहे.
ही माहिती खरी आहे की नाही याची पडताळणी बीबीसीनं केली आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
हा व्हीडिओ फेसबुक आणि ट्विटरवर हजारो जणांनी शेअर केला आहे.
हा व्हीडिओ त्याच माहितीसह गुरुग्राम काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
पण या व्हीडिओबरोबर करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.
म्हणजे हा व्हीडिओ खरा आहे, मात्र त्याबरोबर देण्यात आलेली माहिती खोटी आहे.
व्हीडिओमध्ये मोदी यांचा कोणत्याही पर्सनल मेक-अप आर्टिस्टकडून मेक-अप चाललेला नाही.
व्हीडिओची सत्यता
हा व्हीडिओ मार्च 2016 मधील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेणाची प्रतिमा तयार करण्यासाठी मादाम तुसाँ गॅलरीमधील लोक त्यांच्या शरीराची व चेहऱ्याची मापं घेण्यासाठी आले होते.
व्हीडिओमधील लोक मोदींच्या चेहऱ्याचा मेक-अप करत नसून त्यांच्या चेहऱ्याची आणि शरीराची मापं घेत आहेत.
मादाम तुसाँचा अर्जही व्हीडिओत दिसत आहे.
आपण हा खरा व्हीडिओ मादाम तुसाँच्या युट्यूबवर पेज पाहू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
माहिती अधिकारातील माहितीचे वास्तव
या व्हीडिओबरोबर एक मेसेज फिरत आहे. 'माहिती अधिकारातून मिळालेले उत्तर' असा तो मेसेज आहे. पण त्याला काही आधार नसल्याचे बीबीसीने केलेल्या पडताळणीत समजले आहे.
पंतप्रधानांच्या कपडे किंवा मेक-अप खर्चाशी निगडित कोणताही प्रश्न पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती अधिकाराबाबत दिलेल्या माहितीत सापडलेला नाही.
या कार्यालयाला साधारणपणे शैक्षणिक पात्रता, सुट्या, वायफायचा स्पीड, मोदींच्या दिवसाचे वेळापत्रक याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.
2018 साली माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार रोहित सभरवाल यांनी 1988 पासून झालेल्या पंतप्रधानांच्या कपडेखर्चाची माहिती मागवली होती. त्यात अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे.
ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे त्याची कार्यालयीन नोंद नाही. तसेच पंतप्रधानांच्या वेशभूषेचा खर्च सरकारी खात्यातून होत नाही असंही कार्यालयानं कळवलं आहे.
पंतप्रधानांच्या मेक-अपबाबत माहिती अधिकारातून कोणताही प्रश्न विचारल्याचं बीबीसीला सापडलेलं नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








