You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना काश्मीर आणि काँग्रेसवरून सवाल
लातुरमधल्या औसात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला आहे. तर शरद पवार यांना त्यांनी काश्मीर प्रश्नावर सवाल विचारले आहेत.
मोदींच्या भाषणातले ठळक मुद्दे
1) वारकरी पगडी परिधान केलेल्या मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणास्रोत, शक्तीदायिनी, शौर्यदायिनी, आई तुळजाभवनी, सिद्धेश्वर महाराज आणि पुण्यभूमीला माझा साष्टांग नमस्कार असं मोदी म्हणाले.
2) एवढ्या उन्हाळ्यात तुमची तपश्चर्या सुरू आहे. हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. तुमचं प्रेम मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. मोठी उद्दिष्टं गाठण्यासाठी धाडस अंगी येतं. लातूर आणि परिसराकडे संकटांला टक्कर देण्याची क्षमता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्वाभिमानी स्वराज्याची कल्पना मांडली होती, तेच स्वराज्यकडे वाटचाल करतो आहोत.
3) ही उद्दिष्टं प्राप्त करण्यात तुम्ही सहकार्य दिलंत, त्याकरता तुमचा आदरपूर्वक कृतज्ञ आहे. पाच वर्षांची कमाई म्हणजे तुमचा विश्वास. जे काम करायचं आहे त्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. संकल्पित भारत, सशक्त भारत बनवण्याचा संकल्प देशासमोर ठेवला आहे. राष्ट्रवाद आमची प्रेरणा आहे. सुशासन आमचा मंत्र आहे. नव्या भारताच्या निर्माणासाठी देशातल्या प्रत्येकाचं योगदान हवं आहे.
4) विरोधी पक्षांचा दुतोंडी कारभार आहे. दहशतवाद्यांच्या गोटात घुसून मारू हा नवा मंत्र आहे. जम्मू काश्मीरात राष्ट्रवाद्यांच्या मनात आम्ही एक विश्वास जागवला आहे. स्थिती सामान्य होते आहे. फुटीरतावाद्यांना थारा नाही. मोठं काम सुरू झालं आहे. नक्षलीवाद्यांना वेचून काढू, आदिवासींचा विकास. माओवादमुक्त भारताचा संकल्प. सांस्कृतिक वारसा जगभर नेण्याचं काम केलं.
शरद पवारांवर टीका
5) काँग्रेसचा विचार देशविरोधी आहे. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम कोणत्याही परिस्थितीत हटवलं जाणार नाही. काँग्रेसची भाषा तीच पाकिस्तानची भाषा. पाकिस्तान आपल्या देशातील फुटीरतावाद्यांना खतपाणी घालत आहे. काँग्रेसवर विश्वास ठेवला जाऊ शकतो का? 1947मध्ये अशा हिंमतीसह काँग्रेस उभी राहिली असती तर देशाची फाळणी झाली नसती, पाकिस्तान निर्माणच झाला नसता. पाकिस्तानची भाषा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रतीत होते आहे. मानवाधिकाराची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. काँग्रेस आणि भेसळयुक्त सहकारी पक्षांमुळे सुरक्षेची स्थिती अशी झाली आहे. काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान म्हणणाऱ्यांबरोबर काँग्रेस आहे. शरदराव, तुम्ही अशा लोकांबरोबर आहात? तुम्हाला हे शोभा देतं का?
6) हे लोक माझ्यापाठी लागले आहेत. मला शिव्या देत आहेत. भारताने पाकिस्तानचं विमान पाडलं नाही असा त्यांचा दावा आहे. तुम्हाला किती पुरावे हवे आहेत? पुरावे शोधू नका. एअर स्ट्राईक केलं त्याच दिवशी पाकिस्तानने प्रतिकार केला. पाकिस्तानने दोन पायलट सांगितले. दोन विमानं सांगितलं. त्याच दिवशी संध्याकाळी एक पायलट, एक विमान असं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागलं. वीर जवानांच्या साहसावर विश्वास नाही. यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. खोटं बोलणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं. राजकीय स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं. आता जे निर्णय होत आहेत ते देशहितासाठीच.
7) गाव आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने निरंतन काम केलं आहे. उत्पन दुप्पटीने वाढावं यासाठी आम्ही 22 एमएसपी निश्चित केलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गोळा होत आहेत. नवं सरकार आलं की सर्व शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे. किसान क्रेडिट 1 लाखपर्य़ंत विनाव्याज पैसे मिळतील. देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना. 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याला पेन्शन मिळेल.
8) सर्जिकल स्ट्राईक करू असं आम्ही जाहीरनाम्यात सांगितलं नव्हतं. आवश्यकता भासल्यावर ते केलं. 10 टक्के गरिबांना आरक्षण देऊ असं म्हटलं नव्हतं. मध्यमवर्गीय गरिबांना कोणताही गाजावाजा न देता आरक्षण दिलं. घरोघरी शौचालय, प्रत्येकाचं बँकखातं आम्ही लागू केलं. काँग्रेसने जाहीरनाम्यातली वचनं कधी पूर्तता केली नाही. आम्ही जाहीरनाम्यतील गोष्टी पूर्ततेसाठी जीवाचं रान करतो. काँग्रेस लोकांना फसवतं.
9) शिवाजी महाराज महान प्रशासक. जनतेच्या भावना जाणणारे जाणते नेते होते. त्यांनी पाण्यासाठी केलेल्या योजना मोलाच्या. त्यांनी दिलेला विचार आजही चिरंतन आहे.
10) जलशक्तीसाठी स्वतंत्र मंत्रालय होणार आहे. देशभरात नद्यांची जोडणी केली जाईल. तलाव, जलसंचय, प्रत्येक शेतात पाणी यासाठी आम्ही काम करत आहोत.
11) पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनो, तुमचं पहिलं मत बालाकोट एअरस्ट्राईक करणाऱ्या सैनिकांप्रती असू द्या. वीर शहीदांसाठी तुमचं मत समर्पित करा. तुम्ही देशासाठी मतदान करा. देशाने तुम्हाला संधी दिली आहे. देश मजबूत करण्यासाठी मत द्या. कमळाला मत द्या. धनुष्यबाणाला मत द्या. तुमचं मत मोदीच्या खात्यात येईल.
12) काँग्रेस-राष्टवादीत गटबाजी आहे. कौटुंबिक स्वार्थात अडकले आहेत. काँग्रेस एका कुटुंबाच्या विकासामागे आहे. बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते. काँग्रेसने ठाकरेंकडून शिकावं. नोटा देऊन मतं विकत घेणाऱ्यांना मत देऊ नका. चौकीदार चोर है असं मला म्हणतात. नोटा त्यांच्याकडे मिळाल्या आहेत. चौकीदाराचं भय कोणाला? एवढ्या नोट्या कुठून येत आहेत. मला शिव्या देणारच. ते इमानदारीने भ्रष्टाचार करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)