You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कुंभमेळ्यात माझा एकटेपणा कमी होतो' - 360 डिग्री व्हीडिओ
हा 360 डिग्री व्हीडिओ पाहण्यासाठी तुमच्याकडे Chrome, Opera , Firefox किंवा Internet explorer हवं. किंवा मोबाईलवर तुम्ही हा व्हीडिओ यू ट्यूबवर पाहू शकता..
कुंभमेळा भारतातील सगळ्यात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. विहंगम दृश्यं ही या मेळ्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
कुंभमेळा नुकताच अलाहाबाद (आताचं प्रयागराज) ला पार पडला. गंगा आणि यमुनेच्या तीरावर वसलेल्या या शहरात हा महोत्सव अनेक शतकांपासून आयोजित केला जातो. गेल्या दोन दशकांपासून हा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य होऊ लागला आहे. कुंभमेळा 12 वर्षांतून एकदा होतो. माघ मेळा हे त्याचंच छोटं रूप आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या काळात साधारण 22 कोटी लोकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली.
या नद्यांमध्ये स्नान केल्यावर पाप धुऊन निघतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती होऊन मोक्षप्राप्ती होते, अशी हिंदूंची धारणा आहे.
साधू हे कुंभमेळ्यातील मुख्य आकर्षण असतात.
नदीतून स्नान करून बाहेर आल्यावर ते अंगाला राख फासतात आणि 'हर हर गंगे' असा जप करतात.
हे सगळं असलं तर कल्पवासी हा ज्येष्ठ व्यक्तींचा गट जवळजवळ एक महिना नदीकिनारी राहून आध्यात्मिक समाधान मिळवतात आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
अनेकांसाठी कुंभमेळा अध्यात्माच्या पलीकडे आहे. इथे आलं की त्यांचा एकटेपणा कमी होतो, असं ते सांगतात.
बीबीसीच्या व्हर्च्युअल रिअलिटी फिल्मने गिरीजा देवी (वय 68) आणि मनोरमा मिश्रा (वय 72) या दोन कल्पवासी स्त्रियांचा या कुंभमेळ्यात माग घेतला. त्या दोघी पहिल्यांदाच या महोत्सवात भेटल्या आणि त्यांच्यात मैत्री झाली.
"एकटेपणा हा खेड्यातील वृद्धांसाठीची एक मोठी समस्या आहे. बहुतांश तरुण मंडळी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने शहरात गेले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक खेड्यातच राहिले. मात्र आम्हाला दुसरा पर्याय नाही. कारण त्यांचं करिअर आणि आयुष्यही महत्त्वाचं आहे. मला चार मुलं आणि तीन मुली आहेत. त्यांच्यापैकी कुणीही माझ्याबरोबर राहत नाही. त्यामुळे इथे आल्यावर मला खूप आनंद होतो. मला इथे माझ्या वयाची लोकं भेटतात आणि ते अगदी कुटुंबांसारखे होतात," मिश्रा सांगत होत्या.
देवी यांचीही अशीच काहीशी कथा आहे.
"आमच्या लग्नानंतर दोन वर्षांतच माझे पती वारले. नंतर माझ्या वडिलांनी माझी काळजी घेतली. पण तेसुद्धा 15 वर्षांपूर्वी वारले. मी माझ्या खेड्यात एकटी राहते. मला कुणाशीतरी भेटायला कितीतरी दिवस वाट पहावी लागते. कुंभमेळ्यात माझा एकटेपणा थोडा कमी होतो. मला फार आनंद होतो. हा तात्पुरता आनंद असला तरी या आनंदाची मी वाट पाहते," त्या सांगत होत्या.
सर्व छायाचित्रांचे हक्क सुरक्षित
निर्मिती :
दिग्दर्शन, निर्मिती, लेखन - विकास पांडे
कार्यकारी निर्माते - जिलाह वॅटसन, अँगस फोस्टर
बीबीसी व्ही. आर. हब प्रोड्युसर - निअला हिल्ल
सहायक निर्माते - सुनील कटारिया
हायपर रिअॅलिटी स्टुडिओज
डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी -विजया चौधरी
संकलन आणि ध्वनी संयोजन - चिंतन कालरा
क्रिएटिव्ह डायरेक्टर - अमरज्योत बैदवान
फिल्ड प्रॉडक्शन - अंकित श्रीनिवास, विवेकसिंग यादव
विशेष आभार - उत्तर प्रदेश सरकार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव, कुंभमेळा प्रशासन
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)