लोकसभा निवडणूक: मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या तुमच्या मतदारसंघात या तारखांना होणार मतदान

निवडणूक

लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. देशात यंदा 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या वेळी 9 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं.

महाराष्ट्रात यंदा 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. त्याच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. गेल्या वेळी महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं.

पहिला टप्पा - 11 एप्रिल (7 जागा)

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम

व

दुसरा टप्पा - 18 एप्रिल (10 जागा)

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

व

तिसरा टप्पा - 23 एप्रिल (14 जागा)

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

व

चौथा टप्पा - 29 एप्रिल (17 जागा)

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

व

चार टप्प्यांत मतदान झाल्यामुळे पंतप्रधान मोदी अधिक ठिकाणी प्रचार करू शकतील, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीवर बोलताना केला.

त्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की हीच संधी राहुल गांधींकडेही आहे, पण ते त्याचा वापर करू शकणार नाहीत.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की महाराष्ट्रासारख्या शांत आणि स्थिर राज्यात 4 टप्प्यांची आवश्यकता काय आहे.

राजदीप

फोटो स्रोत, Twitter

राज्यात 2014 साली 8.07 कोटी मतदार होते. यावेळी 8.73 कोटी मतदार मतदान करतील. 2014 पासून राज्यात 65,31,661 मतदारांनी वाढ झाली आहे.

इतर महत्त्वाचे मुद्दे:

  • यंदा निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील.
  • 2014च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले.
  • EVM चा दुरुपयोग टाळण्यासाठी सर्वत्र VVPAT चा वापर केला जाईल.
  • EVM च्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त, EVMचं जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार.
  • 10 लाख मतदान केंद्रांवर होणार मतदान. 2014 वेळी 9 लाख मतदान केंद्र होती.
  • मतदार यादीत आपलं नाव आहे पाहण्यासाठी हेल्पलाईन नंबर - 1950
YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

अँड्रॉईड अॅप

आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगानं अँड्रॉईड अॅप आणले आहे. या अॅपवर तक्रार करताना तक्रारकर्त्यांना आपलं नाव, संपर्क क्रमांक सांगावा लागेल. तसंच तक्रारीनंतर 100 मिनिटांत काम केलं जाणार.

शिवाय सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वं यंदा तयार करण्यात आली आहेत.

यंदा पहिल्यांदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चा वापर केला जाणार, त्यामुळे सर्वांना आता त्यांनी दिलेल्या मताची खात्री करता येणार.

तसंच यंदा तब्बल 10 लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

सध्याच्या 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपणार आहे. त्यामुळे त्याआधी 17 वी लोकसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)